Pakistan | दूषित सीरिंज पुन्हा वापरल्याने 331 मुले एचआयव्ही पॉझिटिव्ह

पाकिस्तानात रुग्णालयाचा निष्काळजीपणा; 8 वर्षांच्या मुलाच्या मृत्यूनंतर खुलासा
कराची : 10 वर्षांची आसमा (बदललेले नाव) एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे, तर तिच्या आईचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
कराची : 10 वर्षांची आसमा (बदललेले नाव) एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे, तर तिच्या आईचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
Published on
Updated on

कराची; वृत्तसंस्था : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील ताऊंसा शहरात 331 मुले एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळली. ही प्रकरणे नोव्हेंबर 2024 ते ऑक्टोबर 2025 दरम्यान नोंदवली गेली. आता या प्रकरणात सरकारी रुग्णालयात गंभीर निष्काळजीपणाचे आरोप झाले आहेत. बीबीसीच्या अहवालात असे आढळून आले की टीएचक्यू ताऊंसा रुग्णालयात एकाच सीरिंजचा पुन्हा पुन्हा वापर केला जात होता.

अहवालानुसार अनेक प्रकरणांमध्ये एकाच औषधाच्या बाटलीतून वेगवेगळ्या मुलांना इंजेक्शन देण्यात आले. यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका वाढला. आठ वर्षांच्या मोहम्मद अमीनच्या मृत्यूनंतर हे प्रकरण उघडकीस आले. त्याची बहीण आसमा देखील एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे. आईचे म्हणणे आहे की, मुलांना रुग्णालयात उपचारादरम्यान दूषित सुईमुळे एचआयव्ही झाला.

32 तासांत 10 वेळा वापरली गेली सीरिंज

बीबीसीच्या तपासणीत 32 तासांची गुप्त रेकॉर्डिंग करण्यात आली. यात 10 वेळा सीरिंज मल्टी डोस वायलमध्ये पुन्हा वापरली गेली असल्याचे दिसून आले. यापैकी चार प्रकरणांमध्ये तेच औषध इतर मुलांना देण्यात आले. संक्रमक रोग विशेषज्ञ डॉ. अल्ताफ अहमद यांनी व्हिडीओ पाहिल्यानंतर सांगितले की, सीरिंजचा मागील भाग विषाणू संक्रमित करू शकतो, जरी नवीन सुई लावली असली तरी. त्यांनी याला अत्यंत धोकादायक म्हटले. तपासात असेही समोर आले की, रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांनी 66 वेळा निर्जंतुकीकरण न केलेल्या हातमोज्यांशिवाय इंजेक्शन दिले. एका परिचारिकेला वैद्यकीय कचरा पेटीत हातमोज्यांशिवाय हात घालतानाही पाहिले गेले. तज्ज्ञांनी याला संसर्ग नियंत्रणातील मोठी कमतरता म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news