पुढारी ऑनलाइन डेस्क : वॉशिंग्टन राज्यातील म्युटिनी बे येथे रविवारी दुपारी तीनच्या सुमारास (स्थानिक वेळेनुसार) 10 जणांना घेऊन जाणारे फ्लोट विमान कोसळले. plane Crash या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर नऊ जण अद्याप बेपत्ता आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, यूएस कोस्ट गार्डने सांगितले की व्यावसायिक चार्टर्ड सीप्लेनमध्ये नऊ जणां आणि एक मूल होते. हे विमान फ्रायडे हार्बरवरून जात असताना व्हिडबे बेटाच्या नैऋत्येला ते कोसळले. स्थानिक वेळेनुसार दुपारी 3 ते 4 च्या दरम्यान झालेल्या अपघातातून एक मृतदेह बाहेर काढण्यात आला होता, परंतु विमानातील इतर नऊ जण बेपत्ता आहेत.
"कोस्ट गार्ड सेक्टर प्युगेट साउंड कमांड सेंटरमधील वॉचस्टँडर्सना दुपारी 3:11 वाजता (पॅसिफिक स्टँडर्ड टाइम) (भारतीय वेळेनुसार रविवारी 23:11 GMT) फ्रायडे हार्बरवरून निघाल्यानंतर सिएटल टॅकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाण्याचा मार्गावर एक फ्लोट प्लेन क्रॅश झाल्याचा अहवाल मिळाला, ज्यामध्ये नऊ प्रौढ आणि एक लहान मूल होते," असे यूएस कोस्ट गार्ड पॅसिफिक नॉर्थवेस्टने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
न्यूयॉर्क टाईम्सच्या हवाल्याने तटरक्षक दलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, "हवाई आणि तटरक्षक दलाचे कर्मचारी बेपत्ता ९ जणांचा शोध घेत आहेत. तर अपघाताच्या कारणाचा तपास सुरू आहे."