भारतीय महिलांची गगनभरारी | पुढारी

भारतीय महिलांची गगनभरारी

भारतीय महिलांनी वैमानिकाच्या बाबतीत संपूर्ण जगाला मागे टाकले असून, इंटरनॅशनल सोसायटी ऑफ वूमन एअरलाईन पायलटस् या संस्थेने एक अहवाल जारी करून ही माहिती दिली आहे. ज्या देशात पुरुषांची मक्‍तेदारी मानली जात होती, आज तिथेही महिला झेंडा फडकावताना दिसत आहेत. हवाई आणि तांत्रिक क्षेत्र त्यांच्यासाठी आकर्षण ठरले आहे. भारतीय सशस्त्र दलातही महिला वैमानिकांच्या भरतीला वेग आला आहे.

भारतीय महिला वैमानिकांना त्यांच्या कुटुंबीयांकडूनही पूर्ण पाठिंबा मिळत आहे. त्यामुळेच हे क्षेत्र महिलांना खुणावू लागले आहे. प्रादेशिक विमान कंपन्या जगभरातील बहुतांश महिलांना नोकरी देतात. भारतातील प्रादेशिक विमान कंपन्यांमध्ये 13.9 टक्के महिला पायलट आहेत, तर भारतीय मालवाहू विमान कंपन्यांमध्ये सर्वात कमी महिला पायलट आहेत. यामध्ये कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया हे देश आघाडीवर आहेत.

विमान कंपन्या पुरवतात अत्यावश्यक सुविधा

बहुतांश विमान कंपन्यांकडून आरामदायक वातावरण.

महिला वैमानिकांना अतिशय सोप्या अटींवर नोकर्‍या उपलब्ध.

महिला वैमानिकांना गरोदरपणात उड्डाण करण्याची परवानगी नाही.

 कायद्यानुसार त्यांना 26 महिन्यांच्या पगारासह प्रसूती रजा.

लहान मुलांच्या संगोपनासाठी विशेष रजा मिळते.

 मूल 5 वर्षांचे होईपर्यंत महिला वैमानिक करारानुसार सुट्टी घेऊ शकतात.

Back to top button