Los Angeles | लॉस एंजेलिसच्या ईस्ट हॉलिवूडमध्ये वाहन लोकांच्या गर्दीत घुसले, २० जण जखमी

अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमधील ईस्ट हॉलिवूडमध्ये एक वाहन गर्दीत घुसल्याची घटना घडली
Los Angeles
लॉस एंजेलिसच्या ईस्ट हॉलिवूडमध्ये वाहन लोकांच्या गर्दीत घुसले.(source- X)
Published on
Updated on

Los Angeles

अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमधील ईस्ट हॉलिवूडमध्ये शनिवारी एक वाहन लोकांच्या गर्दीत घुसल्याने किमान २० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. यातील पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. लॉस एंजेलिस अग्निशमन विभागाने ही माहिती दिली आहे. याबाबतचे वृत्त एपी वृत्तसंस्थेने दिले आहे. ही घटना सांता मोनिका बुलेव्हार्ड येथे घडली.

Los Angeles
Pak 7 most wanted terrorist | जगाने ठरवले दहशतवादी, पाकिस्तानमध्ये मात्र VVIP; संयुक्त राष्ट्र, एफएटीफने सांगुनही कारवाई नाहीच...

स्थानिक वेळेनुसार ही घटना पहाटे २ वाजता घडली. एक अज्ञात वाहन अचानक लोकांच्या गर्दीत घुसले. यामुळे गोंधळ उडाला. ज्या ठिकाणी ही घटना घडली ते संगीत स्थळाच्या परिसरात आहे. घटनास्थळावरील काही छायाचित्रे समोर आली असून त्यात फुटपाथवर एक राखाडी रंगाची कार दिसते. तर रस्त्यावर वाहनाचे तुटलेले अवशेषही दिसून आले आहेत. या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे.

Los Angeles
Trump on India-Pakistan conflict | भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवलं; ट्रम्प यांचा पुनरूच्चार, 5 विमाने पाडली गेली...

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news