बोंबला! पुतीनच्या मुलीचं ‘झेलेन्स्की’बरोबर लफडं; एक मुलगीदेखील…

बोंबला! पुतीनच्या मुलीचं ‘झेलेन्स्की’बरोबर लफडं; एक मुलगीदेखील…

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशिया आणि युक्रेनचं युद्ध इतकं पेटलं आहे की, रशियाच्या लष्कराने युक्रेन पूर्ण उद्ध्वस्त करून टाकलं आहे. या पार्श्वभूमीवर झेलेन्स्की आणि पुतीन यांच्या खासगी आयुष्यावरील अनेक रुचकर स्टोरीज माध्यमांमध्ये वाचायला मिळत आहेत. अशात आणखी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे व्लादिमीर पुतीन यांच्या मुलीचं चक्क झेलेन्स्कीबरोबर लफडं आहे. या दाव्यामुळे नेटवर चांगलीच चर्चा रंगली आहे.

नवीन दाव्यानुसार पुतीन यांची मुलगी कॅटरिना तिखोनोवाचे एका बॅले डान्सरसोबत अफेअर आहे. त्याचं नाव इगोर झेलेन्स्की आहे. कॅटरिनाला त्याच्यापासून एक मुलगीसुद्धा आहे. हा दावा रशियन मीडिया आऊटलेट आयस्टोरीज आणि जर्मन वर्तमानपत्र डेर स्पिगल यांनी केला आहे. पुतीन यांची मुलगी कॅटरिना हिला इगोर झेलेन्स्कीपासून एक मुलगीदेखील आहे, असंही त्यांनी सांगितलेलं आहे.

जर्मनीच्या म्यूनीच शहरात इगोर झेलेन्स्की राहतो. कॅटरिनाने २०१८-१९ मध्ये म्युनीच शहराचा ५० पेक्षा जास्त वेळा प्रवास केला आहे. रशियन मीडियामध्ये काही कागदपत्रांचाही उल्लेख केला आहे. त्यामध्ये कॅटरिनाच्या प्रवासाचे रेकाॅर्डदेखील आहेत. या रेकाॅर्डमध्ये एका लहान मुलीचाही पासपोर्ट आहे. ती पुतीन यांची नात असू शकते, असंही सांगितलं आहे.

हा प्रवास करत असताना कॅटरिनाने रशियाच्या राष्ट्राध्यक्षांसाठी सुरक्षेसाठी असलेल्या एजन्सीच्या विमानांचा वापर केलेला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचे अडनाव आणि कॅटरिनाचा बाॅयफ्रेंड इगोर झेलेन्स्कीचे अडनाव सारखेच आहे. द गार्डियनने दिलेल्या माहितीप्रमाणे इगोर झेलेन्स्कीने ४ एप्रिलला खासगी कौटुंबिक कारण देत संबंधित कंपनीच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. दोघे कुठे गायब आहेत, हे अजूनही कोणाला माहीत नाही.

व्हिडीओ पहा : ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्याशी खास गप्पा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news