डेटा लीक प्रकरण : झुकेरबर्गचे टिम कुकला उत्तर | पुढारी

डेटा लीक प्रकरण : झुकेरबर्गचे टिम कुकला उत्तर

वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन

फेसबुकचा संस्थापक मारर्क झुकेरबर्ग याने  डेटा लीक प्रकरणानंतर ॲपलचे सीईओ टिम कुक यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले. झुकेरबर्गने म्हटले आहे की, कुक यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. फेसबुक हे फक्त श्रीमंतांसाठी नाही. जर फेसबुकच्या प्रत्येक सेवेसाठी शुल्क आकारले गेले तर ते कोणीही  वापरणार नाही.

डेटा लीक प्रकरणानंतर काल एका मुलाखतीमध्ये झुकेरबर्गने सांगितले की, फेसबुक ही अशी सेवा आहे जी जगातील प्रत्येकाला  एकमेकांशी जोडते. त्यातील काही लोक असे आहेत जे यासाठी पैसे देवू शकत नाही. प्रत्येकाची अर्थिक परिस्थिती तितकी चांगली नाही. जाहिरातीवर आधारित बिजनेस मॉडेल ही एक पद्धत आहे. कारण फेसबुक जर आपल्या सेवांसाठी पैसे घेऊ लागले तर लोकांना ते परवडणारे नाही.

ॲपलचे सीईओ टिम कुक यांनी फेसबुकच्या डेटा कलेक्शन करण्याच्या पद्धतीवर टीका केली होती. फेसबुक वापरकर्त्याची वैयक्तिक माहिती घेते आणि ती जाहिरातदारांना विकते असा आरोप टिम कुक यांनी केला होता. जर आम्हीही ग्राहकांकडून अशी माहिती घेतली तर भरपूर पैसे कमावू शकतो पण आम्ही तसे कधीच करणार नाही असे टीम कुक यांनी म्हटले होते.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीदरम्यान ५ कोटी फेसुबक वापरकर्त्यांच्या खाजगी माहितीचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप फेसबुकवर करणण्यात आला आहे. या निवडणुकीनंतर डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष बनले होते. डेटा लीक प्रकरणानंतर झुकेरबर्गने चुक कबूल करत फेसबुकवरुन माफी मागितली होती.

यापूर्वी देखील कुक आणि झुकेरबर्ग यांच्यात आरोप प्रत्यारोप

२०१५ मध्ये टिम कुकने मोफत सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांची निंदा केली होती. ज्या कंपन्या मोफत सेवा पुरवतात त्या बदल्यात लोकांची खाजगी माहिती विकून पैसा कमावतात. त्यावेळी त्यांचा रोख फेसबुकवरच होता. तेव्हा झुकेरबर्गने म्हटले होते की ॲपल ग्राहकांच्या हिताकडे दुर्लक्ष करते. जर ग्राहकांची काळजी ॲपलला असती तर त्यांचे प्रोडक्ट इतके महागात विकले नसते.

Tags : Mark Zuckerberg, Facebook, Apple, CEO, Answer 

Back to top button