‘ग्रीन कार्ड’ हवंय तर १५१ वर्ष थांबा!

वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन 

अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी देण्यात येणाऱ्या ग्रीन कार्डसाठी उच्च पदवीधारक भारतीयांना तब्बल १५१ वर्ष वाट पहावी लागणार असल्याचा दावा अमेरिकेतील एका संस्थेने केला आहे. वॉशिंग्टनमधील केटो इंस्टिट्यूट या संस्थेने एक सर्वे केला होता. त्या सर्वेतून  मिळालेल्या आकड्यांनुसार हा निष्कर्ष लावण्यात आला आहे. 

ब्रिटिशांनी भारतावर १५० वर्ष सत्ता गाजवली. तेवढे वर्ष आपण ब्रिटीशांची गुलामी सहन केली. आता अमेरिकेत स्थायिक होणासाठी त्या गुलामीपेक्षाही जास्त काळ लागणार आहे. 

अमेरिकेतील नागरिकता आणि स्थलांतर सेवा विभागा अंतर्गत हा सर्वे केटोने पूर्ण केला आहे. या सर्वेत २०१७ पासून दिल्या गेलेल्या ग्रीन कार्डचा आकडाही लक्षात घेण्यात आला आहे. त्यानुसार २० एप्रिल २०१८ पर्यंत ६ लााख ३२ हजार २१९ भारतीय नागरिक त्यांचे पती-पत्नी, मुले, आई-वडील ग्रीन कार्डच्या प्रतिक्षेत होते. 

विविध श्रेणीतील लोकांच्या ग्रीन कार्ड मिळण्याचा अवधी वेगवेगळा आहे. ग्रीन कार्ड हातात मिळण्याचा सर्वात कमी अवधी हा ईबी-१ श्रेणीसाठी तर सर्वात जास्त अवधी हा ईबी-२ श्रेणीच्या नागरिकांसाठी आहे. श्रेणी २ मधील नागरिकांना ग्रीन कार्डसाठी १५१ वर्ष वाट पहावी लागणार आहे. जोपर्यंत या कायद्यात कोणताही बदल होत नाही तोवर नागरिकांना ग्रीन कार्डसाठी १५१ वर्ष वेटींग करावे लागणार आहे. 

ग्रीन कार्ड का हवे? 

अमेरिकेमध्ये कायमचे राहायचे असेल व काम करायचे असेल तर त्यासाठी ग्रीन कार्ड मिळावे लागते. तरच आयुष्यभर अमेरिकेत राहण्याची परवानगी मिळते. 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news