शिंजो ॲबे जिंकले; जपानच्या पंतप्रधानपदी सर्वाधिक काळ सत्तेत राहण्याचा विक्रम

Published on
Updated on

टोकियो (जपान) : पुढारी ऑनलाईन

जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांनी लिबरल डेमोक्रेटिक पार्टीच्या नेतेपदाची पुर्ननिवडणूक तिसऱ्यांदा जिंकली आहे. यामुळे ते पुढील तीन वर्षे पंतप्रधानपदी कायम राहणार आहे. तसेच ते यामुळे सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहणारे व्यक्ती बनणार आहेत. हा त्यांचा विक्रमी आहे.   

६३ वर्षाचे असलेले ॲबे यांना ५५३ मते मिळाली आहेत. तर त्यांच्या विरोधातील माजी संरक्षणमंत्री शिंगेरू इशिबा यांना २५४ मते मिळाली. यामुळे ॲबे पुढील तीन वर्षे पदावर कायम राहणार आहेत. याआधी १९०१ आणि १९१३ या दरम्यानच्या काळात तारो कात्सुरा हे तीनवेळा पंतप्रधानपदावर कायम राहिले होते. त्यांच्याहून अधिक काळ ॲबे पदावर राहणार आहेत. वयाच्या ५२ व्या वर्षी २००६ मध्ये पहिल्यांदा ते पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. त्यावेळी ते जपानमधील सर्वांत तरूण पंतप्रधान ठरले होते.

ॲबे यांच्या विजयानंतर त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यानंतर बोलताना ॲबे म्हणाले की, "आता संघर्ष संपला आहे, आम्ही आता सर्वांनी एकत्र येऊन एकमेकाचा हात हातात धरून नवीन जपान बनवूया."

जपानची अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत आणण्यामागे ॲबे यांची महत्वाची भूमिका आहे. दरम्यान, अॅबे पुढील महिन्यात कॅबिनेटचा विस्तार करणार असल्याचे समजते. तसेच ते संयुक्त राष्ट्र महासभा आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर बैठकीसाठी न्यू यॉर्कला जाणार आहेत.

भारत आणि जपान यांच्यात द्विपक्षीय संबंध चांगले आहे. भारतात बुलेट ट्रेनसाठी जपान मदत करत आहे. 

 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news