

Germany Knife Attack : जर्मनीतील हॅम्बुर्ग रेल्वे स्थानकावर माथेफिरु महिलेने केलेल्या चाकू हल्ल्यात १८ जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी ३९ वर्षीय महिलेला अटक केली आहे. हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, जखमींपैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे.
हल्लेखोर महिला शुक्रवारी सायंकाळी हॅम्बुर्ग स्टेशनवरील १३ आणि १४ क्रमाकांच्या प्लॅटफॉर्मवर आली. येथे तिने एक हाय-स्पीड आयसीई ट्रेनमधून बाहेर पडणार्या प्रवाशांवर चाकू हल्ला केला. अचानक घडलेल्या घटनेने एकच खळबळ माजली. भयभीत प्रवाशांनी आरडाओरडा केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतलाच तत्काळ स्टेशनवरील चार ट्रॅक बंद करण्यात आले. तसेच काही रेल्वेचे मार्गही बदलण्यात आले.
आतापर्यंतच्या तपासात या हल्ल्याचे कारण स्पष्ट झालेले नाही. महिलेल्या मानसिक अवस्थेबाबतही पोलीस माहिती घेत आहेत. दरम्यान, जर्मनीमध्ये सार्वजनिक निवडणुकीच्या काही दिवस आधी फेब्रुवारी महिन्यात म्युनिकमध्ये एका कारने गर्दीवर आदळल्याने किमान ३० लोक जखमी झाले होते. २४ वर्षीय अफगाण नागरिक आणि आश्रय शोधणारा ड्रायव्हरला घटनास्थळावरून तातडीने ताब्यात घेण्यात आले होते.अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यासह उच्च-प्रोफाइल आंतरराष्ट्रीय व्यक्ती म्युनिक सुरक्षा परिषदेसाठी शहरात येण्याची अपेक्षा करण्याच्या काही तास आधी ही घटना घडली होती.