अमेरिकेतील टेक्सासमध्ये गोळीबारात ५ जणांचा मृत्यू; २१ जखमी | पुढारी

अमेरिकेतील टेक्सासमध्ये गोळीबारात ५ जणांचा मृत्यू; २१ जखमी

वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन

अमेरिकेतील टेक्सासमध्ये दोन बंदुकधाऱ्यांचा रक्तपात सुरूच असून आता तरूणाने अडवल्याच्या रागातून गोळीबार केल्याची घटना समोर आली. या भीषण गोळीबारात ५ जणांचा मृत्यू तर २१ जण जखमी झाले. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन तरूणांनी पहिला एक ट्रक हायजॅक करून गोळीबारास सुरुवात केली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 

स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, मिडलँडजवळ ओडेसा परिसरात ही घटना घडली. यातील एका बंदुकधाऱ्यासह सिनर्जी चित्रपट गृहाजवळ ठार करण्यात यश आले आहे. मृत झालेल्या बंदूकधाऱ्याचे वय ३० असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

याआधी ऑगस्ट महिन्यात अमेरिकेतील टेक्सास आणि ओहियोमध्ये गोळीबाराच्या घटना घडल्या. या दोन्ही घटनांमध्ये 29 जणांचा मृत्यू झाला असून 40 हून अधिक लोक जखमी झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेक्सास आणि ओहियोमधील गोळीबाराच्या घटनेचा तपास करण्याचे आदेश दिले.  

Back to top button