हावडी मोदी ते नमस्ते ट्रम्प! दोन्ही कार्यक्रमाचा ट्रम्प यांच्या प्रचारात खूबीने वापर करण्यास सुरुवात! | पुढारी

हावडी मोदी ते नमस्ते ट्रम्प! दोन्ही कार्यक्रमाचा ट्रम्प यांच्या प्रचारात खूबीने वापर करण्यास सुरुवात!

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

नोव्हेंबरमध्ये अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. या अनुषंगाने अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रचाराला वेगाने सुरुवात केली आहे. अमेरिकेत सद्या २० लाखांपेक्षा जास्त अमेरिकन भारतीय मतदार आहेत. या मतदारांचा फायदा घेण्यासाठी ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आपल्या प्रचाराच्या व्हिडिओत वापर केला आहे. यात पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यातील आणि ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यातील चित्रफितींचा समावेश करण्यात आला आहे.

अधिक वाचा : ऑस्टेलियातही गणरायाचे उत्साहात आगमन

अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यावर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात भारत दौऱ्यावर होते. यावेळी अहमदाबाद येथे मोठ्या संख्येत जमलेल्या नागरीकांना संबोधित केले होते. ट्रम्प यांच्यासोबत पत्नी मेलेनिया, मुलगी इव्हान्का, जावई जारेद कुशनर तसेच त्यांचे प्रशासकीय अधिकारी आले होते. ‘ट्रम्प व्हिक्ट्री फायनान्स कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष किम्बर्ली गुइलफॉयल यांनी व्हिडीओ टाकत म्हणाले की, अमेरिकेचे भारतासोबतचे संबध चांगले आहेत. तसेच भारतीयांचे अमेरिकेला मोठे समर्थन मिळाले आहे. 

अधिक वाचा : पुढील ७३ दिवसांत येणाऱ्या ‘त्या’ लसीवर सिरमकडून खुलासा

या प्रचाराचे नेतृत्व करणारे ज्युनियर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे अमेरिकन समुदायाशी चांगले संबंध आहेत असे या व्हिडीओला रिट्वीट करताना म्हटले आहे. फोर मोअर इयर्स’ या १०७ सेकंदाच्या व्हिडिओची सुरूवात पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौर्‍याने आहे. ह्युस्टनच्या एनआरजी स्टेडियमवर मोदी आणि ट्रम्प हे दोघे अभिवादन करतानाची झलक दाखवण्यात आली आहे.

अधिक वाचा : भारतीयांना दिलासा! पुढच्या ७३ दिवसांत येणार कोरोनाची लस

जगातील दोन मोठ्या लोकशाही देशांच्या नेत्यांनी ५० हजारांपेक्षा जास्त संख्येने भारतीय-अमेरिकन लोकांना संबोधित केले होते. अमेरिकेत त्यांच्या हजारो समर्थकांपैकी ट्रम्प यांचे त्या भाषणात मोदींनी कौतुक केले. ट्रम्प व्हिक्टरी इंडियन अमेरिकन फायनान्स कमिटीचे सह-अध्यक्ष अल मेसन यांनी या व्हिडिओची रूपरेषा निश्चित केली आहे. 

अधिक वाचा : शवागृहात रिया म्हणाली, सॉरी बाबू…

मोदी भारतीय-अमेरिकन लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. यामुळे त्यांच्या भाषणाला विक्रमी गर्दी होती. २०१५ मध्ये मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये त्यानंतर दोन वर्षांनी सिलिकॉन व्हॅलीमध्ये त्यांचे भाषण ऐतिहासिक होते. ज्यात मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये ह्युस्टनमध्ये झालेल्या त्याच्या ‘हाउडी मोदी’ या कार्यक्रमात विक्रमी ५० हजार नागरिकांनी हजेरी लावली होती.

Back to top button