भारतीय वंशाच्या प्रियांका राधाकृष्‍णन न्यूझीलंडमध्ये झाल्या मंत्री

Published on
Updated on

मेलबर्न : पुढारी ऑनलाईन 

न्यूझीलंडमध्ये मंत्रीपदी स्‍थान मिळवणाऱ्या प्रियांका राधाकृष्‍णन या भारतीय वंशाच्या पहिल्‍या महिला सदस्‍य ठरल्‍या आहेत. न्यूझीलंडमध्ये जॅसिंडा अर्डन यांनी काल (सोमवार) आपल्‍या मंत्रिमंडळात पाच नव्या मंत्र्यांचा समावेश केला. यामध्ये जॅसिंडा अर्डन यांचा समावेश आहे. भारतात जन्मलेल्‍या प्रियांका यांचे शालेय शिक्षण सिंगापूरमध्ये घेतले. यानंतरचे शिक्षण त्‍यांनी न्यूझीलंडमध्ये पूर्ण केले. त्‍यांनी नेहमीच घरगुती हिंसाचारातील पीडित महिला आणि शोषित स्थलांतरित मजुरांसाठी त्‍यांनी आवाज उठवला. २०१७ मध्ये मजूर पक्षाच्या वतीने त्‍या संसदेवर निवडून आल्‍या. 

अधिक वाचा : वाहतुकीचे नियम तोडणे पडले महागात, स्‍कूटरच्या किमतीपेक्षाही अधिक केला दंड

त्यांना सरकारमध्ये काही महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल, अशी आम्हाला अपेक्षा होती आणि पंतप्रधानांनी त्यांना तशी संधी देण्याचे संकेतही दिले, असं प्रियांका यांचे वडील आर राधाकृष्णन म्हणाले. आर. राधाकृष्णन हे सध्या चेन्नईत वास्तव्यास आहेत. न्यूझीलंड सरकारमधील त्या पहिल्या भारतीय मंत्री ठरल्या आहेत. राजकारणात संधी मिळाल्यानंतरही त्यांनी आपल्या कुटुंबाला विसरू नये, असा सल्ला त्‍यांनी दिल्‍याचं म्‍हटले आहे. 

अधिक वाचा : करिना कपूरचं सेकेंड प्रेग्नेंसीमध्ये 'हे' आहे खास डाएट

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी सामाजिक सहिष्णुतेवर भर दिला. आर्डर्न यांच्या मंत्रिमंडळात, धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरणारे सामाजिक वैविध्य, विकास व जनकल्याण खाते सांभाळण्यासाठी प्रियांका राधाकृष्णन यांची निवड झाली आहे. या खात्यांसह रोजगार खातेही त्यांच्याकडे असेल. प्रियांका राधाकृष्‍णन यांचे कुटुंब चेन्नईहून सिंगापूरला गेले आणि तिथे शालेय शिक्षण पूर्ण करून प्रियांका वेलिंग्टनमध्ये समाजकार्य पदवी अभ्यासक्रमासाठी न्यूझीलंडला आल्या. येत्या शुक्रवारी त्‍या मंत्रीपदाची ६ नोव्हेंबरला शपथ घेतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news