ट्रेंड पनीर टिक्का पण त्याचं नात अमेरिका इलेक्शनशी; काय आहे समीकरण? | पुढारी

ट्रेंड पनीर टिक्का पण त्याचं नात अमेरिका इलेक्शनशी; काय आहे समीकरण?

वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन

जगातील सर्वात जुन्या लोकशाही देशामध्ये अर्थात अमेरिकेत मंगळवारी राष्ट्रपतीपदासाठीची अंतिम टप्प्यातील निवडणूक होत आहे. दरम्यान, ट्विटरवर पनीर टिक्का हा पदार्थ ट्रेंडवर येऊ लागला. ट्रेंड ओपन करून पाहिला असता अमेरिका निवडणुकीचे संदर्भ दिसू लागले आहेत. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. अमेरिका निवडणूक आणि भारतीय पदार्थ पनीर टिक्का याचा काय संबंध असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. 

खरंतर भारतीय पदार्थाचा अमेरिका निवडणुकीशी कोणताच संबंध नाही. परंतु भारतीय वंशाच्या अमेरिकन काँग्रेस महिला प्रमिला जयपाल यांच्या ट्विटमुळे पनीर टिक्का ट्रेंडमध्ये आला आहे. 

निवडणुकीच्या आदल्या रात्री मिसेस जयपाल यांनी साधंसुधं जेवण जेवण्याचे निश्चित केले होते. दरम्यान, उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी आवडती डिश उत्तर भारतातील कोणत्याही प्रकारचा टिक्का असल्याचे म्हटले होते. त्यामुळे जयपाल यांनी पनीर टिक्का खाण्याचे ठरवले. 

कमला हॅरिस यांनी उत्तर भारतातील कोणत्याही प्रकारचा टिक्का आवडत असल्याचे सांगितले आहे. असे सांगत जयपाल यांनी ट्विटरवर डिशचे फोटो शेअर करत मतदान करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, #BidenHarris2020 असा हॅशटॅगदेखील दिला आहे.

जगातील सर्वात जुन्या लोकशाही देशामध्ये मंगळवारी राष्ट्रपतीपदासाठीची अंतिम टप्प्यातील निवडणूक संपन्न होत आहे. डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार तसेच विद्यमान राष्ट्रपती डोनॉल्ड ट्रम्प यांच्यामध्ये ही लढत होत आहे. 

Back to top button