नवाझ शरीफ यांच्या मुलीच्या जेल सेलमधील बाथरुममध्ये कॅमेरा? 

इस्लामाबाद : पुढारी ऑनलाईन 

पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाझ) च्या उपाध्यक्षा मरियम नवाझ शरीफ यांनी गुरुवारी जेल प्रशानलावर आरोप केला. त्यांनी प्रशासनाने आपल्या जेल सेलमध्ये तसेच बाथरुममध्ये कॅमेरा बसवल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. 

मरियम नवाझ शरीफ यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्याला अटक झाल्यानंतर सहन कराव्या लागलेल्या त्रासबद्दल सांगितलं होतं. त्यांना चौधरी साखर कारखान्याच्या एका प्रकरणात गेल्या वर्षी अटक झाली होती. मरियम म्हणाल्या 'मी दोन वेळा जेलमध्ये गेले. तेथे महिला म्हणून मला चांगली वागणूक मिळाली नाही. त्यांनी दिलेल्या या वागणुकीबद्दल मी वाचा फोडल्यानंतर त्यांना (सरकार) त्यांचे तोंड लपवायलाही जागा राहणार नाही.' 

मरियम यांनी सत्ताधारी पक्ष पाकिस्तान तेहरीक- ए- इन्साफ यांच्यावर टीका केली. जर सरकार माझ्या रुममध्ये घुसून माझे वडील नवाझ शरीफ यांच्यासमोर अटक करत असेल आणि माझ्यावर वैयक्तीक पातळीवर जावून हल्ला करत असेल तर पाकिस्तानमध्ये कोणतीही महिला सुरक्षित नाही. त्या पुढे म्हणाल्या 'पाकिस्तानातील असो किंवा इतर कोणत्याही ठिकाणची महिला असो ती दुर्बल नाही.'

दरम्यान, जिओ न्यूजने मरियम नवाझ शरीफ यांनी त्यांचा पक्ष लष्कराशी घटनेला अनुसरून पाकिस्तान तहरीक – ए -इन्साफ पक्षाचे सरकार कसे हटवता येईल यावर चर्चा करण्यात तयार असल्याचे वृत्त दिले आहे. याचबरोबर मरियम यांनी त्या कोणत्याही सरकारी व्यवस्थेच्या विरोधात नाहीत पण, गुप्ततेत कोणतीही चर्चा होणार नाही. याचबरोबर त्यांनी पाकिस्ताना डेमॉक्रेटिक मुव्हमेंटच्या मार्फत चर्चा करण्याच्या कल्पनेवर विचार करता येईल, असे सांगितले. 

पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाझ) च्या नेत्या मरियम यांना गेल्या वर्षी मनी लाँडरिंगच्या प्रकरणात अटक झाली होती. दरम्यान, मरियम यांनी नॅशनल अकाऊंटिब्लिटी ब्युरो यांनी केलेली ही अटक कायद्याचे उल्लंघन करुन केली आहे. तसेच त्यांना राजकराणाचा बळी करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news