डेटिंग अ‍ॅप्सद्वारे ‘व्हर्च्युअली सेक्स’चं प्रमाण वाढलंय! | पुढारी

डेटिंग अ‍ॅप्सद्वारे 'व्हर्च्युअली सेक्स'चं प्रमाण वाढलंय!

पुढारी ऑनलाईन डेस्क

“अरे यार! माझी गर्लफ्रेंड मुंबईला आणि मी यवतमाळमध्ये… छान भेटायचा प्लॅन केलेला होता… पुण्याच्या पर्वती टेकडीवर फिरायला जायचं… मस्तपैकी हाॅटेलमध्ये रात्रीचं जेवण करायचं… एखाद्या कपलफ्रेंडली लाॅजवर ती रात्री घालवायची… पण, सगळं या कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे सगळं फिस्कटलंय”, राजू आपली खंत बोलून दाखवत होता. मित्रांनो! मागील दीड वर्षांपासून कोरोनाचा प्रत्येक क्षेत्रात जसा परिणाम झालाय, तसाच परिणाम माणसांच्या नाजूक भावनिकतेवर आणि त्यांच्या लैंगिक आयुष्यावर मोठा परिणाम झालाय. 

The Best Virtual First Date Ideas to Really Get to Know Each Other

लोकं घरात बंद आहेत. बाहेर पडता येत नाही. सोशल मीडियावर वेळ घालवून झाल्यावर एकटेपणाची जाणीव माणसाला कुरतडत राहते. त्यामुळेच बरीच माणसं आता डेटिंग अ‍ॅप्सला जवळ करताहेत. लाॅकडाऊन सुरू झाल्यामुळे लोकांनी eHarmony, OKCupidm, Match, Tinder, Grinder यांसारख्या डेटिंग अ‍ॅप्सवर लोकांनी आपलं एकटेपण घालविण्यासाठी किंवा जोडीदाराला शोधण्यासाठी, तिच्या गप्पा मारण्यासाठी मोठ्या प्रमाणात डाऊनलोड केलेलं आहे, असं डेटिंग अ‍ॅप्स कंपन्यांनीच सांगितलं आहे. 

17 Virtual Date Ideas - 17 FaceTime Date Ideas

डेटिंग अ‍ॅप्सवर लोकं तासंतास चॅट करताहेत, व्हिडीओ काॅल करताहेत, व्हर्च्युअली जोडीदाराशी सेक्सच्या भावनाही व्यक्त केल्या जाताहेत. म्हणजे जोडीदाराशी व्हिडीओ काॅल करणं, फोनच्या कॅमेऱ्यासमोर नग्न होणं आणि सेक्सची कल्पना करत हस्तमैथुन करणं, हे प्रकार लाॅकडाऊनच्या काळात झालेले आहे. व्हिडीओ चॅट्स आणि फोन सेक्स करणं न्यू नाॅर्मल गोष्ट झाली आहे. पण, तरीही लोक आपल्या जोडीदाराला प्रत्यक्ष भेटण्याच्या संधीची आवर्जुन वाट पाहताहेत. 

Survey: 40% of single Indians to opt for virtual dating in 2021 - Times of  India

या लाॅकडाऊनमुळे डिनर डेट्स शक्य होत नाही. जोडीनं फिरायला जाणंही शक्य होत नाही. अहो, या कोरोनामुळे लग्न करणं, डेटवर जाणं आणि सेक्ससुद्धा व्हर्च्युअली म्हणजे फोनच्या कॅमेऱ्यासमोर उभा राहून करणं सुरू झालंय. हे सगळं आश्चर्य वाटत असलं तरी माणसांच्या भावनिक आणि शारीरिक आयुष्यात मोठा बदल झालाय. त्याला तंत्रज्ञानाने चांगलीच साथ दिली आहे. कदाचित भविष्यात हे परिस्थिती बदलेलही. पण, डेटिंग अ‍ॅप्समधून माणसाच्या वैयक्तिक आणि खासगी आयुष्यात जो बदल होतो आहे, तो बदल स्वीकारला जाईलही.

Have a date, online, Tech News & Top Stories - The Straits Times

डेटिंग अ‍ॅप्समधून प्रत्येकजण कोणाच्या तरी शोधात आहे. प्रत्येकाला एकटेपणाच्या काळात जोडीदार हवा आहे. असं म्हणतात की, भीतीच्या वातावरणात प्रेम जास्त फुलतं. तिचं परिस्थिती आपल्याला सध्या आपल्याला पाहायला मिळतेय. जेव्हा मानवी जीवनात एचआयव्हीने किंवा एड्सने प्रवेश केला. असं वाटलं की, लोक जास्त सेक्स करणार नाहीत. पण, एचआयव्हीने फारसा फरक पडला नाही. उलट लोकांनी कंडोमचा पर्याय स्वीकारत सेक्स करण्याचं सोडलेलं नाहीय. मात्र, कोरोना हा एचआयव्हीसारखा नाही. तो साधा स्पर्श जरी केला तरी पसरतो. त्यामुळे लैंगिक इच्छांवर मर्यादा आलेल्या आहेत. म्हणून लोक डेटिंग अ‍ॅप्सचा आधार घेत आहेत. 

सर्वाधिक वाचले जाणारे…

प्रथमच सेक्स करताय? तर, ‘ही’ काळजी नक्की घ्या! 

लोकांची सेक्स करण्याची इच्छा का कमी होतेय?

कोरोनानंतर किती दिवसांनी करावा सेक्स?

Back to top button