Ukraine Drone Attack | युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यात रशियात १३ ठार, ४८ जखमी

Ukraine Drone Attack  |
Ukraine Drone Attack | युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यात रशियात १३ ठार, ४८ जखमीFile Photo
Published on
Updated on

किव्ह; वृत्तसंस्था : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनने सोमवारी (दि. १०) रशियातील निझ्नेकाम्स्क शहरावर मोठा ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू, तर ४८ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका मुलाचाही समावेश आहे. निझ्नेकाम्स्क हे रशियातील महत्त्वाचे औद्योगिक शहर आहे. येथे दोन तेलशुद्धीकरण प्रकल्प आणि एक मोठा पेट्रोकेमिकल प्रकल्प आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले, रशियाने युद्ध थांबवून चर्चेच्या टेबलावर यावे, यासाठी हे हल्ले दबाव निर्माण करण्याच्या मोहिमेचा भाग आहेत. रविवारी रात्री सोशल मीडियावरील संदेशात ते म्हणाले होते की, रशियाच्या प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर दिले जाईल.युक्रेनने विकसित केलेल्या लांब पल्ल्याच्या ड्रोनची क्षमता अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. हे ड्रोन रशियाच्या सीमेत खोलवर हल्ले करण्यास सक्षम आहेत. काही ड्रोन सायबेरियापर्यंत पोहोचल्याचेही वृत्त आहे. सायबेरियातील काही भाग युक्रेनच्या सीमारेषेपासून सुमारे 2000 किलोमीटर अंतरावर आहेत.

निझ्नेकाम्स्क युक्रेनच्या सीमेपासून १२०० किमी दूर

निझ्नेकाम्स्क हे युक्रेनच्या सीमारेषेपासून सुमारे १२०० किलोमीटर अंतरावर आहे. या शहराची लोकसंख्या अंदाजे २.४ लाख आहे. इतक्या दूर असलेल्या शहरावर ड्रोन हल्ला होणे हे युक्रेनच्या लांब पल्ल्याच्या ड्रोन क्षमतेचे निदर्शक मानले जात आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या गोदामावर हल्ला

युक्रेनच्या मध्यवर्ती द्निप्रो भागातील जागतिक आरोग्य संघटनेच्या एका गोदामावर २४ तासांपेक्षा कमी कालावधीत दोन वेळा हल्ला झाला आहे. या हल्ल्यांमध्ये आरोग्य केंद्रांसाठी ठेवलेला आपत्कालीन वैद्यकीय साठा नष्ट झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news