Russia-Ukraine War : पाच दिवसांच्या युद्धात कोण भारी? पुतीन की, झेलेन्स्की? 

Russia-Ukraine War : पाच दिवसांच्या युद्धात कोण भारी? पुतीन की, झेलेन्स्की? 
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशिया आणि युक्रेनच्या युद्धाला सुरूवात होऊन ५ दिवस उलटले आहेत. रशिया १ लाख ९० हजार जवानांसहीत शस्त्रास्त्रं, टॅंक आणि एअरक्राफ्ट्स घेऊन युक्रेनवर चालून गेलाय, तर युक्रेनदेखील आपल्या सैनिकांच्या आणि नागरिकांच्या मदतीने रशियाला कडवा विरोध करत आहे. परंतु, दोन्ही देशांकडूनही युद्धामधील आकडेवारी अधिकृतरित्या दिली जात नाहीये. त्यामुळे या युद्धात नक्की किती जणांचा मृत्यू झाला आहे, हे कळलेलं नाही. दोन्ही देशांचा नेमका किती नुकसान झालंय, हेही कळायला मार्ग नाही. युद्धावर दोन्ही देश नेमका किती खर्च करताहेत, हेदेखील समोर आलेलं नाही.

सैनिकांच्या मृत्यूचा आकडा युक्रेनने किती सांगितला? 

युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकेडवारीनुसार आतापर्यंत २३२ नागरिकांचा मृत्यू, तर १६८४ लोक जखमी झालेले आहेत. पण, यामध्ये किती सैनिक आहे किंवा किती नागरिक आहे, हे स्पष्ट केलेलं नाही. यामध्ये १४ मुलांचा मृत्यू आणि ११६ मुलं जखमी झाली आहे.

सैनिकांच्या मृत्यूचा आकडा रशियाने किती सांगितला? 

माॅस्कोकडून युक्रेनचे किती सैनिक मारले गेले आहे, याची आकडेवारी सांगण्यात आलेली नाही. परंतु, क्रेमलिन यांच्याकडून सांगण्यात आले आहे की, युक्रेनच्या तुलनेत आमच्या सैनिकांच्या मृत्यूचा आकडा कमी आहे. पण, युक्रेनने रशियन सैनिकांच्या मृत्यूचा आकडा ५३०० सांगितला आहे. असं असलं तरी, बातमीमध्ये देण्यात आलेली आकडेवारीच्या खरेपणाचा दावा आमची माध्यमसंस्था करत नाही.

दोन्ही देशांकडील सरंक्षण सामुग्रीचं किती नुकसान झालं? 

युक्रेनने दावा केला आहे की, मागील ४ दिवसांत रशियाला १९१ टॅंक, ८१६ चिलखती वाहने, ६० इंधन टॅंक, १ एइर डिफेन्स, ४ राॅकेट लाॅंचर, २६ फायटर जेट्स, २६ हेलिकाॅप्टर, २ शिप-बोट, ७४ तोफा, सैनिकांची ने-आण करणारी २९१ वाहने आणि ५३०० वेअरहाऊस गमवावी लागली आहेत. दुसरीकडे रशियानेदेखील युक्रेनच्या नुकसानीची आकडेवारी सांगितली आहे.

युक्रेनला १११४ सैनिकांना मारलं आहे. रशियन सैनिकांनी एस-३०० पासून बुमएम-१ आणि एका निशस्त्र ड्रोन उडविण्यात यश आलं आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्रालयलाचे प्रवक्ता इगोर कोनाशेकोव यांनी सांगितलं की, युक्रेनची ३१ कमांड पोस्ट, संचार केंद्रे आणि ३८ एस-३००, ५६ रडार सिस्टम, ३१४ टॅंक, ३१ एअरक्राफ्ट, ५७ मल्टिपल राॅकेट लाॅंचर सिस्टम, २१२ फिल्ड आर्टिलरी गन आणि मोर्टार, तसेच २७४ सैनिकांची वाहने रशियाने उडवली आहेत.

रशियाचं आर्थिक नुकसान किती? 

या युद्धात पश्चिमेकडील देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लावल्यामुळे रशियाची १२९ लाख करोडची अर्थव्यवस्था जी तेल आणि गॅसच्या निर्यातीवर अवलंबून आहे, ती एका फटक्यात ४.१ टक्क्याने घसरणार आहे. आर्थिक निर्बंधांमुळे निर्यातीवर वाईट परिणाम झाला आहे. मशीनरी आणि उपकरणांवरील निर्बंधांमुळे रशियाची अर्थव्यवस्था ०.५ टक्के, मोटरवाहन व पार्ट्सवरील निर्बंधांमुळे ०.३ टक्के, इलेक्ट्राॅनिक्स उपकरणांवरील निर्बंधांमुळे ०.१ टक्के थेट जीडीपीवर परिणाम झालेला आहे.

युक्रेनचं आर्थिक नुकसान किती? 

या युद्धाचा रशियाच्या अर्थव्यवस्थेवर जितका परिणाम होणार आहे, त्यापेक्षा जास्त परिणाम युक्रेनच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. रशियाच्या तुलनेत युक्रेनची अर्थव्यवस्था १० पट छोटी आहे. युक्रेनचा जीडीपी १३.५ लाख करोड रुपये आहे. त्यांची अर्थव्यवस्था सर्वात जास्त आयातीवर अवलंबून आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वीच युक्रेनचं खूप नुकसान झालं होतं. कारण, मोठ्या संख्येने नागरिक देश सोडून गेलेले होते.

या नुकसानीत किती दिवस युद्ध सुरू राहील? 

युक्रेनच्या गुप्त सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एस्तोनियाचे माजी सरंक्षण प्रमुख रिहो टेरस यांनी सांगितलं की, या युद्धामुळे रशियाला रोज १५०८ अब्ज ७२ करोड ४९ लाख ९६ हजार खर्च करावा लागतोय. त्यांनी असंही सांगितलं आहे की, पुतीन यांच्या योजनेनुसार हे युद्ध पुढे सरकत नाहीये. कारण, युद्धावरील रक्कम आणि शस्त्रास्त्रं संपत आहेत. जर युक्रेनने १० दिवस रशियापासून राजधानी कीव्हला वाचवले, तर पुतीन यांना नाईलाजाने युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याबरोबर चर्चा करावी लागेल.

पहा व्हिडिओ : महायुद्धाचे ढग | Pudhari Podcast

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news