Boat Capsizes : जिबूतीजवळ स्थलांतरितांची बोट उलटून : १०९ जणांचा मृत्यू, ११६ जण बेपत्ता

१५ मुलांचा मृतांत समावेश
Djibouti Migrant Boat Capsizes: At Least 109 Confirmed Dead, 116 Missing
Published on: 
Updated on: 

गुहेरे : पूर्व आफ्रिकेतील जिबूती देशातून येमेनच्या दिशेने निघालेली एक बोट समुद्रात बुडाल्याने १५ मुलांसह १०९ जणांचा मृत्यू झाला. तर, अद्याप ११६ जण बेपत्ता आहेत. बोटीमध्ये सुमारे ३०५ स्थलांतरित नागरिक प्रवास करत होते. ८ आणि ९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री जिबूतीमधील ओबोक या बंदर शहराच्या उत्तरेस असलेल्या गुहेरे किनाऱ्याजवळ ही दुर्घटना घडली.

संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेने (आयओएम) दुर्घटनेतील वाचलेल्या नागरिकांच्या हवाल्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

आतापर्यंत बचाव पथकांनी १०९ मृतदेह बाहेर काढले आहेत. या मृतांमध्ये ५२ पुरुष, ४२ महिला आणि १५ निष्पाप बालकांचा समावेश आहे. मृतांमध्ये ९ मुली आणि ६ मुलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातातून ८० हून अधिक जण बचावले असून हे सर्वजण मूळचे इथिओपियाचे नागरिक आहेत.

स्थानिक प्रशासनाच्या मदतीने वाचलेल्या नागरिकांवर तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले असून मृतदेहांच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था केली जात आहे. अजूनही ११६ हून अधिक लोक बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news