

पुढारी ऑनलाईन डेस्क : दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या रविवारी आंतरराष्ट्रीय कन्या दिवस साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय कन्या दिवस लोकांना त्यांच्या मुलींचा सन्मान करण्यास प्रोत्साहित करतो. यंदा हा दिवस २४ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. कारण सप्टेंबर महिन्यातील चौथा शनिवार हा २४ सप्टेंबरला आला आहे. काही लोकांना मुलगी झाली की वाईट वाटते. त्यांना मुलगाच हवा असतो. मुलगी परक्याचे धन मानली जाते, अशा अनेक समजुतींविरोधात लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय कन्या दिवस साजरा करण्यात येतो. आजही स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबळी यांसारख्या अनेक समस्या अस्तित्वात आहेत. (International Daughters Day 2023)
भारतासह अनेक देशांमध्ये लोक मुलीपेक्षा मुलगा व्हावा, यासाठी प्राधान्य देतात. लैंगिक भेदभावामुळे मुलींना बालविवाह, शिक्षण पूर्ण न करु देणे, लैंगिक अत्याचार, लहान मुलांचे घरगुती काम आणि किशोरवयीन गर्भधारणा यासारख्या गोष्टींचा सामना करावा लागतो. अशा कलंकांना तोंड देण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. युनिसेफच्या (UNICEF) माहितीनुसार, जगभरातील १२९ दशलक्ष मुली शाळा शिकू नाहीत. ज्यामध्ये ३२ दशलक्ष प्राथमिक शालेय वयातील, ३० दशलक्ष निम्न-माध्यमिक शालेय वयातील आणि ६७ दशलक्ष उच्च माध्यमिक शालेय वयात आहेत. (International Daughters Day 2023)
आंतरराष्ट्रीय कन्या दिनानिमित्त अनेक संस्था आणि सरकारकडून लिंगभेदाविरुद्ध लढा देण्याचे आणि समान संधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली जाते. पालक त्यांच्या मुलींना आदराने आणि प्रेमाने वागवून त्यांच्यासाठी दिवस खास बनवू शकतात. त्यांनी मुलींनाही समान संधी दिली पाहिजे. कन्या दिनाच्या निमित्ताने पालक त्यांच्या मुलींना भेटवस्तू, चांगली मेजवानी उपलब्ध करुन देतात. शिवाय, मुलींना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन महिला सबलीकरण साध्य केले जाऊ शकते. (International Daughters Day 2023)