

पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO Chief) महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयसस हे बुधवारी (दि. १७) भारत दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी प्राथमिक आरोग्य सेवेतील भारताच्या गुंतवणुकीबद्दल प्रशंसा केली. ते म्हणाले की, "भारत सरकारने आयुष्मान भारत अंतर्गत प्राथमिक आरोग्य सेवेत केलेली गुंतवणूक ही योग्य गुंतवणूक आहे."
माध्यमांशी संवाद साधत असताना घेब्रेयसस म्हणाले की, सर्व उत्पन्न गटातील देशांनी प्राथमिक आरोग्य सेवा (PHC) मध्ये गुंतवणूक करावी. या गुंतवणूकीमुळे 80 टक्क्यांहून अधिक सेवा प्रदान करणे शक्य होते. यामुळे सुरुवातीच्या टप्प्यांवर साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यात मदत होऊ शकते.
घेब्रेयसस पुढे म्हणाले की, नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) EG.5 हा SARS-CoV-2 विषाणूचा एक प्रकार घोषीत केले आहे. त्यामुळे या आजाराविषयी योग्य ती खबरदारी घेणे आणि जागृत राहणे आवश्यक आहे.
हेही वाचा