

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन
CBDT ने पुन्हा एकदा इन्कम टॅक्स भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. आयटीआर भरण्यासाठी आता १५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी 29 डिसेंबर रोजी तब्बल 23 लाख 24 हजार जणांनी विवरणपत्र दाखल केले होते. या दिवसापर्यंत एकूण 5 कोटी 9 लाख 58 हजार 559 इतके आयकर विवरणपत्र दाखल झालेले आहेत.
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी लोकांनी आयकर विवरणपत्र भरले आहेत. आयकर खात्याकडील माहितीनुसार गतवर्षी 5.95 कोटी लोकांनी विवरणपत्र दाखल केले होते.
ज्या करदात्यांनी आयटीआर रिटर्न अद्याप दाखल केलेला नाही, त्यांनी लवकरात -लवकर आपला आयटीआर दाखल करावा, असे आवाहन संबंधित विभागाने केले आहे. जास्तीत जास्त करदात्यांनी आयटीआर भरावा यासाठी आयकर विभागाकडून पुढाकार घेण्यात आला आहे. करदात्यांमध्ये सर्व प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.
जर तुम्ही तुमचा रिटर्न शेवटच्या तारखेपर्यंत भरला असेल आणि तुम्हाला आता तुमची चूक कळली असेल, तर या प्रकरणात तुम्ही सुधारित ITR दाखल करू शकता. मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी सुधारित ITR दाखल करण्याची अंतिम तारीख देखील 31 मार्च 2022 आहे.
यासह, तुम्ही विलंबित ITR मध्ये बिलेटेड सुधारित रिटर्न देखील दाखल करू शकता. तथापि, 2020-21 या आर्थिक वर्षासाठी बिल केलेले आणि सुधारित कर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2021 आहे, त्यामुळे शेवटच्या क्षणी विलंबित रिटर्नसाठी सुधारित रिटर्न भरले जाऊ शकत नाही.