१६ फेब्रुवारीला अजय माकन म्हणाले होते की, १४ फेब्रुवारीला माहिती मिळाली की, पक्षाने दिलेले चेक बँकांनी थांबवले आहेत. बँका आमचे देयके प्रदान करत नाहीत. तसेच काँग्रेस पक्षाचे खातेही गोठवण्यात आले आहेत. याशिवाय देणगी अभियानाची खातीही गोठवण्यात आली आहेत. पक्षाकडे सध्या वीज बिल भरण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठीही पैसे नाहीत. खाते गोठवल्यामुळे केवळ भारत जोडो न्याय यात्राच नाही, तर पक्षांतर्गत सर्व राजकीय घडामोडींवर परिणाम होणार आहे. हे एकप्रकारे लोकशाही गोठवण्यासारखे आहे. पुढे बोलताना अजय माकन म्हणाले की, निवडणुकीपूर्वी पक्षाची खाती गोठवली जात आहेत. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. भाजपने आपल्या खात्यात असंवैधानिकपणे जमा केलेला पैसाही गोठवण्यात यावा, अशीही मागणी त्यांनी केली.