Hyderabad vs Rajasthan : अखेर पाच पराभवानंतर हैदराबादने विजय पाहिला

Hyderabad vs Rajasthan : अखेर पाच पराभवानंतर हैदराबादने विजय पाहिला
Published on
Updated on

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स ( Hyderabad vs Rajasthan ) यांच्यातील सामना हैदराबादने ७ विकेट्सने जिंकत आपली सलग पाच पराभवाची साखळी तोडली. त्यांनी आपल्या पराभवाची डबल हॅट्ट्रिक होण्यापासून रोखली. कर्णधार केन विल्यमसनने शेवटपर्यंत खेळत आपला विजय निश्चित केला. त्याने ४१ चेंडूत नाबाद ५१ धावा केल्या. याचबरोबर वॉर्नरच्या जागेवर आलेल्या सलामीवीर जेसन रॉयने ४२ चेंडूत ६० धावांची खेळी करुन विजयाचा पाया रचला. राजस्थानकडून साकरिया, मुस्तफिजूर आणि लोमरोर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स ( Hyderabad vs Rajasthan ) यांच्यातील सामन्यात राजस्थानने विजयसाठी १६५ धावांचे आव्हान दिल्यानंतर हैदराबादनेही चांगली सुरुवात केली. सलामीवीर जेसन रॉय आणि वृद्धीमान सहा यांनी ५ षटकात ५७ धावांची दमदार सलामी दिली.

ही सलामी जोडी लोमरोरने वृद्धीमान सहाला १८ धावांवर बाद करत फोडली. त्यानंतर जेसन रॉय आणि कर्णधार केन विल्यमसनने दुसऱ्या विकेटसाठी ४१ चेंडूत ५७ धावांची भागीदारी रचून संघाचे ११ व्या षटकात शतक धावफलकावर लावले. दरम्यान, जेसन रॉयने आपले अर्धशथतकही पूर्ण केले होते.

कर्णधार केन विल्यमसनने विजयी मार्ग केला प्रशस्थ ( Hyderabad vs Rajasthan )

मात्र, चेतन साकरियाने ही धोकादायक जोडी फोडली. त्याने १२ व्या षटकात रॉयला ६० धावांवर बाद केले. रॉय बाद झाल्यानंतर आलेल्या प्रियम गर्गला फार काही करता आले नाही. तो मुस्तफिजूरच्या गोलंदाजीवर भोपळाही न फोडता माघारी गेला. आता हैदराबादच्या डावाची संपूर्ण जबाबदारी कर्णधार केन विल्यमसनवर आली होती.

विल्यमसनने अभिषेक शर्माला साथीला घेत चौथ्या विकेटसाठी भागीदारी रचण्यास सुरुवात केली. सामना बॉल टू रन असल्याने दोघांनीही कोणताही धोका पत्करला नाही. ज्यावेळी १८ चेंडूत विजयासाठी २० धावांची गरज होती त्यावेळी विल्यमसनने आक्रमक फटकेबाजी करण्यास सुरुवात केली.

दरम्यान केल विल्यमसन आपल्या अर्धशतकाजवळ पोहचला होता. विजयासाठी ६ धावांची गरज असताना त्याने पाठोपाठ २ चौकार मारत सामना संपवला. याचबरोबर आपले अर्धशतकही पूर्ण केले.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानला भुवनेश्वर कुमारने दुसऱ्याच षटकात एल्विस लुईसला ६ धावांवर बाद करत राजस्थानला पहिला धक्का दिला. लुईस बाद झाल्यानंतर सलामीवीर यशस्वी जयस्वालने आक्रमक फलंदाजी करत पॉवर प्लेचा फायदा उचलण्यास सुरुवात केली.

जयस्वालने कर्णधार संजू सॅमसनच्या साथीने राजस्थानला पॉवर प्लेमध्ये ४९ धावांपर्यंत मजल मारली. यात जयस्वालचा २४ धावांचा वाटा होता. पॉवर प्लेनंतर संजू सॅमसननेही धावांची गती वाढवण्यास सुरुवात केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी रचली.

संदीप शर्माने जोडी फोडली ( Hyderabad vs Rajasthan )

मात्र संदीप शर्माने ही जोडी फोडली. त्याने २३ चेंडूत ३६ धावा करणाऱ्या यशस्वी जयस्वालला बाद केले. जयस्वाल बाद झाला त्यावेळी राजस्थान १० षटकात ७७ धावांपर्यंत पोहचला होता. दरम्यान, राशिद खानने राजस्थानला तिसरा धक्का दिला. त्याने लियम लिव्हिंगस्टोनला ४ धावांवर माघारी धाडले.

संजूची हाणामारी, राजस्थान मोठ्या धावसंख्येकडे ( Hyderabad vs Rajasthan )

त्यानंतर सॅमसन आणि महिपाल लोमरोर या दोघांनी डावाची सुत्रे हातात घेत १४ व्या षटकात संघाचे शतक धावफलकावर लावले. यानंतर राजस्थानच्या फलंदाजांनी आपला गिअर बदलला. त्याने ४१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतर संजू सॅमसन आणि लोमरोरने राजस्थाला १८ व्या षटकात १५० पार पोहचवले.

संजू सॅमसन आणि महिपाल लोमरोर यांनी चौथ्या विकेटसाठी ५५ चेंडूत ८४ धावांची भागीदारी रचली. अखेर कौलने ५७ चेंडूत ८२ धावांची संजू सॅमसनची खेळी २० व्या षटकात संपवली. संजू बाद झाल्यानंतर आलेला रियान परागही आल्या पावली परत गेला. अखेर राजस्थानने २० षटकात ५ बाद १६४ धावांपर्यंत मजल मारली.

[box type="shadow" align="" class="" width=""][visual_portfolio id="40771"][/box]

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news