…अशी घ्या, लहान मुलांच्या त्वचेची काळजी

लहान मुलांच्या त्वचेची काळजी
लहान मुलांच्या त्वचेची काळजी
Published on
Updated on

डॉ. प्राजक्ता गायकवाड :  लहान मुलांमध्ये त्वचा कापली जाणे, जखमा होणे, भाजणे हे वारंवार घडत असते. मुलेही काही वेळा त्वचेला हानी होईल असे वागत असतात. मुलांच्या त्वचेची काळजी घेण्यासंबंधी काही मुद्दयांचा ऊहापोह येथे करण्यात आला आहे.

लहान मुलांची त्वचा खूप नाजूक असते आणि संवेदनशीलही असते. त्यांच्या त्वचेची काळजी घेणे हे पालकांच्या दृष्टीने आव्हानच असते, पण थोडी सावधगिरी बाळगली तर तुमच्या बाळाला तुम्ही त्वचेच्या विकारांपासून सहज दूर ठेवू शकता.

प्रखर सूर्यप्रकाशापासून दूर ठेवणे

तुमच्या मुलांना प्रखर सूर्यप्रकाशात वावरू देऊ नका. हे खूप महत्त्वाचे आहे, कारण प्रखर उन्हात फिरल्यामुळे त्वचेचे काही विकार उद्भवण्याची शक्यता असते, पण मुले उन्हात खेळत असतात. फिरत असतात. मे महिन्यात सुट्टीच्या काळात त्यांच्या खेळण्याला काही सीमा नसते. मुलांना खेळण्यापासून आपण रोखू शकत नाही, पण त्यांना दुपारच्या कडक उन्हात शक्यतो खेळू देऊ नये. दुपारी सावलीत बैठे खेळ खेळण्यास त्यांना सांगावे. सूर्याच्या प्रखरतेचे चोटे त्यांना समजावून सांगावेत. उन्हात जाणे टाळताच येत नसेल तर टोपी तसेच प्रखर उन्हापासून बचाव करणारे कपडे त्यांना घालावेत.

तान्ह्या बाळाची त्वचा संवेदनशील असते. म्हणूनच त्याच्यासाठी वापरत असलेली उत्पादने ही त्यांच्यासाठीच बनवलेली आणि सर्वसामान्य आहेत की नाही याची खात्री करून घ्यावी. काही उत्पादने खास लहान बाळांसाठी असतात. उदाहरणार्थ धुण्याचा साबण, पावडर, मसाज तेल, इ. लहान मुलांना काही ना काही जखमा होतच असतात, पण म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नका. बाळाला लगेच बालरोगतज्ज्ञाला दाखवणे हितकारक ठरते.

हात धुणे

जीवाणू आणि संसर्गापासून बचाव होण्यासाठी नेहमी आपले हात स्वच्छ धुवून घ्यावेत आणि लहान मुलांनाही व्यवस्थित हात धुण्यास वारंवार सांगावे. आपले हात कमीत कमी पंधरा मिनिटे कोमट पाण्याने धुवावेत. चांगला साबण वापरावा व आपले हात एकमेकांवर चांगले रगडून हात धुवावेत. शरीराच्या काही भागात विशेष काळजी घ्यावी लागते, म्हणजे दोन बोटांमधील जागा, नखांमधील मळ वगैरे. कोरड्या पंचाने हात स्वच्छ पुसावेत.

खरूज, नायटा

हा प्रकार किटाणूंमुळे होत नाही. नखांच्या अस्वच्छतेमुळे हे पडते. शरीराच्या वरच्या भागावरील त्वचेवर, हातावर व पायावर लाल रंगाचे आणि गोल आकाराचे चट्टे येतात. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल, मैदानी खेळांत मुले जास्त सहभागी होत असतील तसेच नखे अस्वच्छ राहिल्यामुळे हा संसर्ग होऊ शकतो. त्यावर घरगुती उपाय करत बसण्यापेक्षा डॉक्टरांना दाखवून त्यांच्या सल्ल्यानुसार इलाज सुरू करावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news