

मेष : आज तुम्ही घर आणि कुटुंबाच्या आनंदासाठी वेळ काढाल, असे श्रीगणेश सांगतात. तुमच्या कार्यक्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवून तुमच्या योजना सुरू करा. जमिनी संदर्भातील व्यवहार किंवा कोणतीही ऑर्डर पूर्ण करताना योग्य तपासणी करा. कौटुंबिक बाबींमध्ये जास्त हस्तक्षेप करू नका. आरोग्य उत्तम राहिल.
वृषभ : श्रीगणेश सांगतात की, खूप दिवसांनी घरात पाहुणे आल्यावर आनंदी वातावरण असेल. कौटुंबिक वाद मिटतील. संततीची सकारात्मक कृती तुम्हाला आराम देईल. हट्टीपणा सोडा, नकारात्मक चर्चेपासून लांब राहा. कामाच्या ठिकाणी सहकारी आणि कर्मचाऱ्यांशी संबंध बिघडू देऊ नका.
मिथुन : कौटुंबिक जबाबदाऱ्या तुम्ही योग्यरित्या पार पाडू शकाल, असे श्रीगणेश म्हणतात. घरातील शुभ कार्य पूर्ण करण्याची योजना असेल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहिल. वडिलधाऱ्यांचा आशीर्वाद लाभेल. अचानक झालेल्या नकारात्मक गोष्टीमुळे मतभेदाची स्थिती निर्माण होऊ शकते. कोणतेही नवीन काम आज सुरु करु नका. वैवाहिक नात्यात गोडवा निर्माण होईल.
कर्क : आज ग्रहमान अनुकूल आहे. तुमचे कोणतेही वैयक्तिक काम आज यशस्वीपणे पूर्ण होईल, असे श्रीगणेश सांगतात. अनोळखी व्यक्तीव विश्वास ठेवू नका. व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या योग्यरित्या पार पाडाल. कुटुंबासोबत वेळ व्यतित केल्याने तुमचा उत्साही वाढेल.
सिंह : आज नवीन गोष्टी शिकण्यात आणि समजून घेण्यासाठी वेळ घालवा, असा सल्ला श्रीगणेश देतात. यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यास अडचण येणार नाही. नोकरीत अधिक मेहनत घ्यावी लागेल. वैवाहिक जीवन आनंदी राहिल.अतिकामामुळे थकवा जाणवेल.
कन्या : आज कौटुंबिक किंवा सामाजिक कार्याला महत्त्व द्याल, असे श्रीगणेश सांगतात. अडकलेला पैसे परत मिळवण्याची हीच योग्य वेळ आहे. निष्काळजीपणामुळे विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकणार नाहीत. घसादुखीचा त्रास होवू शकतो.
तूळ : न्यायालयात खटला प्रलंबित असल्यास, निर्णय तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपला पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला श्रीगणेश देतात. नातेवाईक आणि मित्र यांच्याशी संबंध प्रस्थापित होऊ शकतात. वैवाहिक जीवन आनंदी होऊ शकते. पोटाशी संबंधित समस्या जाणवू शकते.
वृश्चिक : आज नियमित कामांव्यतिरिक्त काही वेळ आत्मपरीक्षणात वेळ घालवा. यामुळे तुम्हाला अनेक गुंतागुंतीची कामे व्यवस्थित करण्याची संधी मिळू शकते, असे श्रीगणेश सांगतात. भावांसोबत संघर्ष होणार नाही याची काळजी घ्या. आज कोणत्याही प्रकारची भागीदारी योजना टाळा. पती-पत्नीमध्ये वाद होण्याची शक्यता. आरोग्य थोडे नरम राहू शकते.
धनु : तुमच्या दीर्घकाळ चाललेल्या समर्पणाचा आणि परिश्रमाचा लाभ आज मिळणार आहे, असे श्रीगणेश म्हणतात. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. सार्वजनिक व्यवहारात अधिक लक्ष द्या. पती-पत्नीमधील भावनिक बंध मजबूत होतील.
मकर : नातेवाईकांना सहकार्य केल्याने तुम्हाला मनापासून आनंद मिळेल. तुमच्या नम्र स्वभावामुळे घरात आणि समाजात तुमची प्रशंसा होईल, असे श्रीगणेश सांगतात. शेजाऱ्यांसोबतचा जुना वादही मिटू शकतो. घरातील सर्व सदस्यांना त्यांच्या मनाप्रमाणे वागण्याचे थोडेसे स्वातंत्र्य द्या.
कुंभ : श्रीगणेश म्हणतात की, काही जवळच्या लोकांची भेट फायदेशीर ठरेल. सामाजिक स्तरावरही तुम्हाला नवी ओळख मिळू शकते. आजचा काही वेळ मुलांच्या समस्या सोडवण्यात जाईल. व्यवसायाच्या ठिकाणी बाहेरच्या व्यक्तीच्या हस्तक्षेप टाळा. कुटुंबात आनंदी वातावरण राहिल.
मीन : आज घरात पाहुण्यांच्या आगमनामुळे तुम्ही व्यस्त राहू शकता, असे श्रीगणेश सांगतात. तुमच्या दैनंदिन कामांमधून थोडा आराम आणि मजा करण्यात वेळ घालवाल. मुलांकडून सुवार्ता मिळेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासापासून लक्ष विचलित होऊ शकते. तुम्हाला भावनिकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी काही लोक अफवा पसरवतील.