

पुढारी ऑनलाईन डेस्क : महिंद्रा समुहाच्या ऑफिसमधील बोर्ड रूममध्ये लटकवलेल्या दिव्याचा (Hanging Light) फोटो ट्विटरवर पहायला मिळाला. या दिव्याला सुंदर असे झुंबरचे स्वरूप देण्यात आले आहे. या फोटोवर महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत त्याचं मत व्यक्त केलं.
महिंद्रा समूहाच्या चीफ कस्टमर आणि ब्रँड ऑफिसर आशा खर्गा यांनी गुरुवारी ट्विटरवर लाईट फिक्स्चर फोटोसह एक स्टोरी शेअर केली. त्यांनी एका लटकवलेल्या दिव्याच्या (Hanging Light) छायाचित्राची पोस्ट केली. या फोटोतील लटकवलेला दिवा हा जीपच्या 7-स्लॉट ग्रिलपासून तयार केला आहे, अशी माहीती या पोस्टमधून त्यांनी दिली.
महिंद्रा ग्रुपच्या बोर्ड रूममध्ये लटकणारा दिवा (Hanging Light) हा केवळ लक्षवेधी प्रकाशझोत नसून त्यात असे एक महिंद्रा कनेक्शन आहे जे फक्त "खरे कार प्रेमी" शोधू शकतात, असे म्हणत महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी यावर ट्विट केले.
नवीन-स्वतंत्र भारतासाठी सक्षम ऑफ-रोड वाहने तयार करण्याच्या उद्देशाने, १९४७ मध्ये महिंद्रा समूहाला मुंबईत यूएसएची प्रतिष्ठित विलीज जीप असेंबल करण्याचा परवाना मिळाला. जीपच्या उत्पादनामुळे कंपनीच्या जगातील सर्वात यशस्वी ऑटोमेकर बनण्याच्या प्रवासाची सुरुवात झाली.
"१९४७ मध्ये स्वतंत्र भारतानंतर येथील कच्च्या रस्त्यांवर चालू शकेल यासाठी आयकॉनिक विलीस जीप, यूएसए, यांच्यासोबत जीपला असेंबल करण्याची फ्रेंचायझी मिळाली," असे आशा खर्गा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले. "कधी कधी रस्त्यावर गर्जना करत दिसणारे, छतावर देखील मोहक दिसू शकते. जीपची ग्रील आता आमच्या बोर्ड रूममध्ये एक सुंदर झुंबर बनली आहे," या झूंबरचे छायाचित्र शेअर करताना त्यांनी ही माहीती दिली.
त्यांच्या ट्विटला प्रत्युत्तर देताना आनंद महिंद्रा यांनी म्हणाले की, पाहुण्यांना हा दिवा कशाचा आहे याचा अंदाज घेण्यास त्यांना आनंद वाटतो. "फक्त वास्तविक कारप्रेमी हे कोणत्याही सूचना न देता शोधून काढतील,".
आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये जीपच्या इतिहासाचा उल्लेख करण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांच्या आधीच्या एका ट्विटमध्ये, त्यांनी KC महिंद्रा यांना जीप भारतात आयात केल्याचे श्रेय दिले. ज्यामुळे 'प्रज्वलित' गटातील व्यवसायांपैकी एक असा व्यावसायिक समूह बनला.
हेही वाचा