GT vs KKR : गुजरातचा केकेआरवर दणदणीत विजय

GT vs KKR : गुजरातचा केकेआरवर दणदणीत विजय
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : विजय शंकरची आक्रमक अर्धशतकी खेळी, शुभमन गिलच्या ३५ चेंडूमध्ये ४९ धावा आणि मोहम्मद शमीने घेतलेल्या ३ विकेट्सच्या जोरावर गुजरात टायटन्सने केकेआरवर ७ विकेट्सने विजय मिळवला. हा सामना ईडन गार्डवर खेळवण्यात आला होता. सुरुवातीला गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या केकेआरने २० षटकांअखेर ७ विकेट्स गमावत १७९ धावा केल्या आणि गुजरात समोर १८० धावांचे आव्हान ठेवले. गुजरातने केकेआरच्या १८० धावांचा यशस्वीरित्या पाठलाग केला.

गुजरातकडून विजय शंकर २४ चेंडूमध्ये ५१ धावा, हार्दिक पंड्या २० चेंडूमध्ये २६ धावा, डेव्हिड मिलर १८ चेंडूमध्ये ३२ धावा आणि शुभमन गिल ३५ चेंडूमध्ये ४९ धावांचे योगदान दिले. विजय शंकरच्या आक्रमक खेळीने गुजरातने केकेआरचे आव्हान १७.५ षटकांमध्ये सहजरित्या गाठले. केकेआरकडून सुनिल नरेन, हर्षित राणा आणि आंद्रे रसेलने प्रत्येकी १ विकेट पटकावली.

तत्पुर्वी, केकेआरकडून रेहमानुल्ला गुरबाजने ३९ चेंडूमध्ये ८१, रिंकू सिंह २० चेंडूमध्ये १९ धावा, व्यंकटेश अय्यर १४ चेंडूमध्ये ११ धावा, एन जगदीशन १५ चेंडूमध्ये ११ धावांचे योगदान दिले. केकेआरकडून गुरबाजशिवाय इतर कोणाला मोठी खेळी करता आली नाही.  शेवटच्या षटकांमध्ये आंद्र रसेलने जोरदार फटकेबाजी केली. याच्या बळावरच केकेआरला १७९ धावा करता आल्या. गुजरातकडून मोहम्मद शमी, नूर अमहद आणि जोशुआ लिटलने प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news