राज्यात दिव्यांगांसाठी होणार ‘पर्पल फेस्टिवल’

राज्यात दिव्यांगांसाठी होणार ‘पर्पल फेस्टिवल’
Published on
Updated on

पणजी ः पुढारी वृत्तसेवा : गोवा राज्यातील दिव्यांगांना त्यांच्या अंगभूत गुणांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळावी, यासाठी समाज कल्याण खाते, गोवा राज्य दिव्यांग आयोग, गोवा मनोरंजन संस्था आणि इतर विविध संघटनांच्या सहकार्याने पहिल्या पर्पल फेस्टिवलचे आयोजित केला आहे. दि. 6 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान हा महोत्सव होईल.

पर्वरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी गोवा राज्य दिव्यांग आयोगाचे अध्यक्ष गुरुप्रसाद पावस्कर न इतर मान्यवर उपस्थित होते. मंत्री फळदेसाई यांनी सांगितले, की समाज कल्याण खात्याकडे 19 हजार दिव्यांगांची नोंद आहे. पर्पल फेस्टिवलमध्ये किमान 5 हजार दिव्यांग सहभागी होण्याची शक्यता आहे. दिव्यांग आयोग कायदा योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्यासाठी समाजकल्याण खाते कटिबद्ध आहे.

दिव्यांगावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, यासाठी खाते काम करत आहे. दिव्यांगांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित पर्पल महोत्सव गोवा मनोरंजन संस्था कांपाल ते दोनापावला या दरम्यान होणार आहे. त्यामध्ये अनेक क्रीडा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, जलक्रीडा तसेच इतर विविध स्पर्धा आणि उपक्रमांचा समावेश असेल.

40 इमारतींमध्ये दिव्यांगांसाठी व्यवस्था

पणजी परिसरातील चाळीस महत्त्वाच्या इमारतीमध्ये दिव्यांगांना ये-जा करण्यासाठी योग्य व्यवस्था व्हावी, यासाठी आपल्या खात्याने प्रयत्न केले आणि ते यशस्वी ठरले. इतर काही इमारतीमध्ये दिव्यांगाना येजा करण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी, यासाठी त्यांना सूचना करण्यात
आल्याचे फळदेसाई यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news