गोवा : सांकवाळ येथे फ्लॅट फोडला

गोवा : सांकवाळ येथे फ्लॅट फोडला
Published on
Updated on

वास्को : पुढारी वृत्तसेवा :  उपासनगर सांकवाळ येथे दोन चोरट्यांनी एका इमारतीतील फ्लॅट फोडून काही मौल्यवान वस्तू लंपास केल्या. अन्य तीन फ्लॅट फोडण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न सुरू असताना शेजार्‍यांना जाग आल्याने चोरटे पसार झाले. या चोरट्यांच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेर्‍यात बंदिस्त झाल्या आहेत. यातील एका चोरट्याला स्थानिकाने पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्याने पकडणार्‍याला मारहाण करून पलायन केले असल्याची चर्चा तेथे सुरू होती.

काही महिन्यांपूर्वी तेथील इमारतीच्या तळमजल्यावरील औषधालय व किराणा मालाचे दुकान फोडण्यात आले होते. रविवारी मध्यरात्री पुन्हा चोरट्यांनी त्याच इमारतीमध्ये चोरीचा प्रयत्न केला. पोलिस कर्मचारी कमी असल्याने रात्रीच्या वेळी सगळीकडे गस्त घालणे कठीण होत असल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे.

उपासनगर येथे एका इमारतीमध्ये सोमवारी मध्यरात्री पावणे एकच्या दरम्यान दोन चोरटे शिरले. त्या दोघांनी चेहर्‍यावर मास्क लावला होता. अंगावरील शर्ट काढले होते. हातात हत्यार घेऊन स्थूल चोरटा जिन्यावरून पुढे येतो. त्याच्यामागून दुसरा येतो. तेथे त्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. आतून कुत्र्याचा आवाज आल्याने त्यांनी तेथून पळ काढला. त्या इमारतीमध्ये राहणार्‍या एका फ्लॅटधारकाला आपल्या दरवाज्याजवळ कसला आवाज आल्याने त्याने 'आयहोल' मधून बाहेर पाहिले असता एक व्यक्ती तेथे उभी असल्याचे दिसली. त्याने आपल्या प्लॅटच्या बाहेरील दिवा लावला.

इमारतीतील एका फ्लॅटधारकाला व समोरच्या इमारतीतील दुसर्‍या एका मित्राला तसेच पोलिसांना फोन केला. या दरम्यान ते चोरटे निघून गेले. परंतु जाताना त्या चोरट्यांनी फ्लॅटच्या मुख्य दरवाजाला बाहेरून कडी लावली. काही वेळानंतर पोलिस तेथे पोहोचले. तोवर चोरटे पळून गेले होते.

अनोळखी व्यक्तींची चौकशी करा

चोरट्यांनी त्याच इमारतीतील दोन फ्लॅट फोडले. इतर फ्लॅटच्या दरवाज्यांना कडी लावण्यात आल्याने रहिवाशांना बाहेर पडता आले नाही. त्या चोरट्यांकडे हत्यारे असल्याने ते चोरटे हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने त्यांना पकडण्यासाठी फ्लॅटच्या बाहेर पडणे धोकादायक होते. पोलिसांनी अनोळखी व्यक्तींची चौकशी करण्याची गरज काहीजणांनी व्यक्त केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news