गोवा : माजी उपनिबंधकाला अटक; जमीन हडपप्रकरणी झाली कारवाई

गोवा : माजी उपनिबंधकाला अटक; जमीन हडपप्रकरणी झाली कारवाई

पणजी : पुढारी वृत्तसेवा ;  राज्यात घडलेल्या कोट्यवधी रुपयाच्या जमीन घोटाळाप्रकरणी माजी उपनिबंधक ( सब रजीस्ट्रार) प्रेमानंद देसाई याला अटक करण्यात आली आहे. राज्यातील जमिनी बनावट कागदपत्रे करून विकण्याच्या प्रकरणांचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथक (एसआयटी) ने ही कारवाई केली आहे.

यापूर्वी बार्देशच्या तत्कालीन मामलेदारासह अनेक दलालांना याच प्रकरणी अटक केली होती. त्यातील बहुतांश जामीनावर बाहेर आहेत. आता काणकोणचे माजी उपनिबंधक असलेल्या प्रेमानंद देसाई याला एसआयटीने अटक केली आहे. देसाई याने बनावट वारसा हक्क प्रमाणपत्रे जमीन हडप करणाऱ्या दलालांना करून दिल्याचा आरोप आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news