गोवा : कळंगुटला अकरा डान्सबारना टाळे

गोवा : कळंगुटला अकरा डान्सबारना टाळे
Published on
Updated on

कळंगुट / म्हापसा : पुढारी वृत्तसेवा : कळंगुट पंचायतीच्या क्षेत्रातील बेकायदा ११ डान्सबार बंद केले आहेत. ही माहिती कळंगुट पंचायतीचे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी बुधवारी दिली. कळंगुट पंचायतीचे एका पंच सदस्याच्या पुत्रास बिगर गोमंतकीय दलालांकडून मारहाण झाल्यानंतर कळंगुट पंचायत आक्रमक झाली.

त्यांनी कळंगुट पोलिसांच्या सहकार्याच्या दिनांक पाच रोजी रात्री कळंगुट बागा परिसरात डान्सबारविरोधात धडक मोहीम राबवली. त्यांनी १६ डान्सबारची पाहणी केली. या सर्व डान्सबार ना यापूर्वी कारणे दाखवा नोटीस बजावलेली होती. यातील सर्व डान्सबार बेकाय़दा असल्याचे निदर्शनास आले. त्यातील श्री किंग्स प्रीमियम क्लब व डेविल क्लब असे दोन डान्सबार त्वरित सील केले होते. दुसऱ्या दिवशी नऊ डान्सबार बंद केले, असे एकूण ११ डान्सबार बंद करण्यात आले.

सरपंच म्हणाले, बेकायदेशीर सुरू असलेल्या डान्स वारचे दलाल लोकांना, पर्यटकांना छळत होते. स्थानिक लोकांना मारहाण करण्यापर्यत त्याची मजल गेली होती. हे डान्सबार रात्रीच्या वेळेस सुरू असतात. त्यामुळे रात्रीची कारवाई करणे शक्य होते याकरिता पोलिसांसोबत ही कार्यवाही करण्यात आली होती. आता शुक्रवारी पुन्हा पाहणी करण्यात येणार आहे.

अनैतिक धंदे

सरपंच जोसेफ सिक्वेरा म्हणाले, कळंगुट पंचायत क्षेत्रातील कोणत्याही डान्सबारना पंचायतीने परवानगी दिलेली नाही व नव्हती. तत्कालीन पंचायतीच्या छुप्या पाठिंब्यामुळे डान्सबार अवैधरित्या सुरू होते. डान्सबारच्या नावाखाली या ठिकाणी अनैतिक धंदे सुरू होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news