Goa Weather Yellow Alert | राज्यात उष्ण व दमट हवामानाचा येलो अलर्ट जारी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Goa Weather Yellow Alert | राज्यात उष्ण व दमट हवामानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून घराबाहेर पडताना उष्णतेपासून बचावाची आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Jalna yellow alert
Jalna yellow alertpudhari photo
Published on: 
Updated on: 


पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यात उष्ण व दमट हवामानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून घराबाहेर पडताना उष्णतेपासून बचावाची आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या राज्यातील तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. साहजिकच उन्हाच्या झळांनी सर्वसामान्य हैराण झाले आहेत.

Jalna yellow alert
Panaji Voter List | पणजी मतदारसंघातील मतदार यादीत फेरफार

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी माघार घेतल्याने व परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने तीव्र उष्णता कायम आहे. गेल्या काही दिवसांत तापमान सरासरीपेक्षा ३ ते ४ अंश सेल्सिअसने जास्त नोंदवले गेले. राज्यातील तापमानाचा पारा प्रथमच सामान्य तापमानापेक्षा ४.६ ने वाढून ३५.६ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. यामुळे सध्याच्या उष्णतेचा प्रभाव वाढत आहे.


१४ ऑक्टोबर रोजी मान्सून नेहमीच्या वेळेपेक्षा लवकर परत जाण्याची शक्यता आहे. हवामान बदलाच्या परिणामांमुळे गोव्यातील तापमान वाढणारच आहे, आणि त्यातच पूर्व विषुववृत्तीय पॅसिफिक महासाकरावर 'गॉडझिला एल निनो'सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news