Goa River Pollution | नद्यांचे अस्तित्व धोक्यात! गोव्यातील सर्वच नद्यांना वाढत्या प्रदूषणाचा विळखा

Goa River Pollution | पर्यावरणवाद्यांचे मत : नद्या वाचविण्यासाठी सामान्यांचाच पुढाकार हवा ; जागृती महत्त्वाची
Goa River Pollution
Goa River Pollution
Published on: 
Updated on: 

पणजी : कांतिराज सम्राट

नदीशी असलेले मानवाचे नाते हे आई-मुलासारखे आहे. नदीवर परिसरातील घटकांचा निरंतर परिणाम होत असतो. नद्यांमधील गाळ, पात्रात फेकला जाणारा कचरा, कपडे, प्लास्टिक, सांडपाणी यामुळे वाढते प्रदूषण आता त्यांच्या अस्तित्वावर आघात करत आहे. अशावेळी सरकार जर दुर्लक्ष करत असेल तर सर्वसामान्यांनी आपली जबाबदारी ओळखून पुढील पिढ्यांसाठी नद्या राखून ठेवणे गरजेचे आहे, असे मत पर्यावरण अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे.

Goa River Pollution
Panaji Voter List | पणजी मतदारसंघातील मतदार यादीत फेरफार

दरवर्षी सप्टेंबर महिन्याचा चौथा रविवार हा आंतरराष्ट्रीय नदी दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने नद्यांची सद्यस्थिती आणि त्यांच्या संवर्धन, सुरक्षिततेची चर्चा व्हावी, असे अपेक्षित असते. रविवारी (दि. २७) यंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा होत आहे. यानिमित्त ज्येष्ठ पर्यावरणवादी राजेंद्र केरकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, राज्यातील सर्वच नद्या प्रदूषणाने ग्रासल्या आहेत.

उगम:च्या ठिकाणी सुरू असलेल्या बेसुमार जंगलतोडीमुळे पाण्याबरोबर आलेल्या गाळाने नदीपात्र भरलेली आहेत. सरकारी पातळीवर अनास्था दिसते. परंतु लोकांमध्येही फारशी जागरूकता नाही. नदीमध्ये कपडे धुणे, वाहने धुणे, प्रक्रिया न केलेले सांडपाणी आणि मलमूत्र थेट पाण्यात सोडल्यामुळे मोठ्या प्रमाणात नद्यांचे प्रदूषण वाढले आहे.

हे रोखण्यासाठी समाजाने वेळीच उपाययोजना केली पाहिजे नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती आहे, असे त्यांनी सांगितले. रेनबो वॉरियर्सचे अभिजित प्रभुदेसाई म्हणाले की, नदी म्हणजे केवळ वाहणारा पाण्याचा साठा नव्हे, तर त्यात तिचे संपूर्ण पाणलोट क्षेत्र आणि त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व जमिनींचा समावेश होतो.

दक्षिण गोव्यातील साळ नदीमध्ये तिच्या पाणलोट क्षेत्रातील सर्व जमिनींचा समावेश होतो. जर वेर्णा पठारावर प्लास्टिकचे वेष्टन किंवा कोणताही इतर प्रदूषक अथवा विषारी पदार्थ टाकला, तर तो प्रत्यक्षात साळ नदीतच टाकल्यासारखा आहे. जुने गोवे येथे झाड तोडले किंवा जमिनीचे उत्खनन केले, तर त्यामुळे मांडवी नदी प्रदूषित होत आहे, हा विचार लक्षात घेणे गरजेचे आहे.

Goa River Pollution
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

राज्यातील नद्यांना आज सर्वांत मोठा धोका कॅसिनो, कोळसा व खनिज वाहतूक आणि पयाच्या व्यवसायासाठी नद्यांचे झालेले खाजगीकरण, राष्ट्रीयीकरण आणि गैरवापर यांपासून आहे. नद्या वाचविण्यासाठी सातत्याने स्थानिकांचे लढे सुरूच आहेत, असेही प्रभुदेसाई यांनी सांगितले.

उपक्रमाची सुरुवात कशी झाली?

मानव आणि नद्यांचे नाते अतिशय जवळचे राहिले आहे. जगभरातील बहुतांश संस्कृतींचा जन्म, विकास आणि अंतदेखील नद्यांच्या काठावरच झाला आहे. मानवी हव्यासामुळे जगभरातील जिवंत नद्यांवर धरणे बांधली गेली आहेत. त्यांचे सिमेंट-कॉंक्रिटीकरण झाले आहे. त्यांचे रूपांतर मृत जलमार्गांमध्ये झाले आहे आणि त्या प्रदूषित झाल्या आहेत. यामुळे नदी संरक्षणाबाबत जागृतीसाठी कॅनडामधील पर्यावरणवादी मार्क अँजेलो यांनी २००५ पासून आंतरराष्ट्रीय नदी दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय नदी संरक्षण दिवस १४ मार्च रोजी दरवर्षी साजरा केला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news