Goa Charter Flight Poland | वॉरसा पोलंड येथून चार्टर विमान गोव्यात दाखल

Goa Charter Flight Poland | १८३ विदेशी पर्यटकांचे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जल्लोषात स्वागत
Goa Charter Flight Poland
Goa Charter Flight Poland
Published on: 
Updated on: 

पणजी (पुढारी वृत्तसेवा): गोव्याच्या २०२६-२७ पर्यटन हंगामाची सुरुवात उत्साहवर्धक झाली असून, पोलंडमधील वॉरसा येथून आलेले पहिले चार्टर विमान सोमवार दि. ९ नोव्हेंबर रोजी मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ मोपा येथे दाखल झाले. रेनबो टूर्सद्वारे संचालित या विमानातून १८३ प्रवासी आले. विमानातील सर्व जागा भरलेल्या असल्याने पॉलिश पर्यटन बाजारपेठेत गोव्याबद्दल असलेली वाढती पसंती अधोरेखित झाली आहे.

Goa Charter Flight Poland
Panaji Market | पणजी बाजारात उष्णतेचा कडाका वाढल्याने लिंबू प्रतिनग 10 रुपयांवर तर शहाळे 70 रुपयांवर पोहोचले

याबाबत सिटा ट्रॅव्हल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्नेस्ट डायस म्हणाले की, पोलंडमधून आलेल्या चार्टर विमानातून १८३ प्रवासी गोव्यात दाखल झाले आहेत. हंगामाची ही अत्यंत उत्साहवर्धक सुरवात आहे. आगामी महिन्यांसाठीही बुकिंगचा प्रतिसाद सकारात्मक असून, आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या पसंतीचे पर्यटनस्थळ म्हणून गोव्याचे आकर्षण कायम असल्याचे यातून दिसून येते.

या आगमनाबाबत गोव्याचे पर्यटन संचालक केदार नाईक म्हणाले, पोलंडमधून मिळालेला उत्साहवर्धक प्रतिसाद गोव्याची आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून असलेली लोकप्रियता अधोरेखित करतो.

Goa Charter Flight Poland
Panaji Municipal Corporation | ...आणि पणजी महापालिकेला आली जाग

पर्यटकांना गोव्यातील विविध पर्यटन अनुभवांमधून विस्मरणीय आनंद देणे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे नाईक म्हणाले. पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले, पोलंडमधून आलेले पहिले चार्टर विमान गोव्याच्या आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्रासाठी उत्साहवर्धक घडामोड आहे.

महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये गोव्याची उपस्थिती अधिक मजबूत करण्यावर हमारा भर आहे. समुद्रकिनाऱ्यांपलीकडे जाऊन गोव्याचा समृद्ध वारसा, संस्कृती, खाद्यपरंपरा आणि ग्रामीण भागातील पर्यटन अनुभव जगासमोर मांडण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, या हंगामात अधिकाधिक आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे स्वागत करण्यास आम्ही उत्सुक आहोत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.