Zilla Parishad election : जि. पं. निवडणुकीसाठी आज मतदान

८,६९,३५६ मतदार ठरवणार २२६ उमेदवारांचे भवितव्य
Zilla parishad
Zilla Parishad ElectionPudhari
Published on
Updated on

Voting for the Zilla Parishad elections is taking place today.

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील जिल्हा पंचायतीच्या ५० जागांसाठी शनिवार, दि. २० डिसेंबर रोजी मतदान होत आहे. २२६ उमेदवारांचे भवितव्य ८,६९,३५६ मतदार ठरवणार आहेत. राज्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ४,२०,६०६ असून महिला मतदारांची संख्या ४,४८,७४५ एवढी आहे. एकूण १,२८४ मतदान केंद्रावर मतपत्रिकेद्वारे सकाळी ८ ते संध्याकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. पक्षीय चिन्हावर मतपत्रिकेद्वारे मतदान होणार असल्याने लोकांना चिन्हासमोर शिक्का मारून मतदान करावे लागणार आहे. राज्य निवडणूक आयोग निवडणुकीसाठी सज्ज असून कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. उत्तर गोव्यातील पाळी व दक्षिण गोव्यातील कवळे या दोन जिल्हा पंचायत मतदारसंघात दुरंगी लढती होत असून, उत्तरेतील ताळगाव, होंडा व केरी तसेच दक्षिण गोव्यातील रिवण, खोला व जि. पं. निवडणुकीसाठी आज मतदान कुठ्ठाळी या मतदारसंघात तिरंगी लढती होणार आहेत.

Zilla parishad
Goa news | गोव्यात जिल्हा पंचायतीसाठी मतदान सुरू, 50 जागांसाठी 226 उमेदवारांमध्ये चुरस

इतर बहुतांश मतदारसंघात चौरंगी लढती होत असून सर्वात जास्त उमेदवार सांकवाळ मध्ये ८ व धारगळमध्ये ७आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष व मगो युती, विरोधी पक्ष काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड युती, आम आदमी पक्ष व रिव्होल्युशनरी गोवन्स (आरजी) या चार पक्षांत चौरंगी ०९ लढती होणार असून काही जागी अपक्ष मैदानात आहेत.

जिल्हा पंचायतींच्या उमेदवारांनी जाहीर प्रचार संपल्यानंतर फोनद्वारे मतदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. सरकारी यंत्रणा निवडणूक प्रक्रियेसाठी सज्ज झाली असून, मतदानासाठी नियुक्त सरकारी कर्मचारी मतदान केंद्राचा ताबा शुक्रवारी संध्याकाळी घेणार आहेत. उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या २५ मतदारसंघात एकूण ४,४०,१९९ मतदार आहेत. त्यात पुरुष मतदार २,१३, ७०४ आणि महिला मतदार २,२६,४९२ आहेत. ३ तृतीयपंथी मतदार आहेत. उत्तर गोव्यातील सुकूर मतदारसंघात सर्वाधिक २४,३१२ मतदार आहेत, तर पाळी मतदारसंघात सर्वांत कमी १४,६२१ मतदार आहेत. दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या २५ मतदारसंघात एकूण ४,२९, १५७ मतदार आहेत. त्यात पुरुष मतदार २,०६, ९०२ आणि महिला मतदार २,२२, २५३ असून २ तृत्तियपंथी मतदार आहेत.

Zilla parishad
Goa Energy Conservation Award | ऊर्जा संवर्धनात गोवा देशात द्वितीय

द. गोव्यात सांकवाळ मतदारसंघात सर्वाधिक २८,४०५ मतदार आहेत, तर सर्वात कमी उसगाव-गांजे मतदारसंघात १२, ६०५ मतदार आहे. उत्तर गोव्यात एकूण ६५८ मतदान केंद्रे आणि दक्षिण गोव्यात एकूण ६२६ मतदान केंद्रे आहेत. राज्य निवडणूक आयोगाने विविध मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी १५ निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. तसेच, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी न्यायदंडाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

राज्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर सरकारी कर्मचाऱ्यांसोबत पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान ९ सदस्य रिंगणात २० डिसेंबर रोजी होत असलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीमध्ये नवोदितांसोबत ९ विद्यमान जि.पं. सदस्य निवडणूक लढवत आहेत. त्यात सिद्धेश नाईक (खोर्ली), महेश सावंत (कारापूर - सर्वण), श्रमेश भोसले (बेतकी खांडोळा), सिद्धार्थ गावस देसाई (शेल्डे) या भारतीय जनता पक्षाच्या चार विद्यमान सदस्यांचा व उमेदवारांचा समावेश आहे. गजानन नाईक (कवळे) हे मगोच्या उमेदवारीवर तर शायनी ओलीवेरा (सांताक्रुझ) या काँग्रेसच्या विद्यमान सदस्या लढत आहेत. अपक्ष सदस्य असलेल्या कविता कांदोळकर (कोलवाळ) या पुन्हा एकदा अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात असून मार्सीन मेंडीस वाझ (कुठ्ठाळी) ही पुन्हा अपक्ष लढत आहेत. भाजपच्या उमेदवारीवर निवडून आलेले सुकूरचे जिल्हा पंचायत सदस्य कार्तिक कुडणेकर हे यावेळी अपक्ष लढत आहेत.

आजच्या दिवशी ऑनलाईन प्रचार जाहीर प्रचार काल गुरुवारी संपल्यानंतर काल रात्रीपासून आज शुक्रवारी रात्रीपर्यंत उमेदवार तसेच विविध पक्षांच्या नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाइन प्रचार केला आणि संदेश, व्हिडिओ टाकून आपापल्या उमेदवारांना मते देण्याची विनंती केली. वैयक्तिक व्हिडिओ टाकले गेल्यामुळे त्यावर कारवाई होऊ शकत नाही याची जाणीव नेत्यांना आणि उमेदवारांना आहे. काहींनी तर रिल्स तयार करून ते सामायिक केले. आपल्या उमेदवाराचे चिन्ह कोणत्या क्रमांकावर आहे, याची माहिती देणारी पत्रके सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचवली गेली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news