Vishwajit Rane | 'विरोधकांचे चॅट्स माझ्या मोबाईलमध्ये!'; मंत्री विश्वजित राणे यांचा खळबळजनक दावा

Vishwajit Rane | विश्वजित राणे यांचा इशारा; पुढील सरकार भाजपचेच
Vishwajit Rane
Vishwajit Rane
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

विरोधी आमदार व नेते भारतीय जनता पक्षात येण्यास उत्सुक आहेत. आता नाही तर निवडणुकीनंतर ते निश्चितपणे भाजपात येतील. पुढील सरकार भाजपचेच असेल. 'गोवा राखण्याची' भाषा करणाऱ्यांपैकी अनेकांचे चॅटिंग माझ्या मोबाईलवर आहे. योग्य वेळी ते जगजाहीर करू, असा इशारा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिला.

Vishwajit Rane
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

बुधवारी एका कार्यक्रमानंतर पत्रकारांनी विरोधकांची युती व काँग्रेसच्या 'गोवा राखण' यात्रेबाबत राणे यांना विचारले असता त्यांनी हा इशारा दिला. राणे म्हणाले की, गेल्या साडेचार वर्षांत प्रादेशिक आराखडा २०२१ नुसार राज्यातील केवळ १४ लाख चौरस मीटर म्हणजेच ०.२९६ टक्के जमीन रूपांतरित केली आहे.

वीस कोटी चौरस मीटर जमिनी विकास निषिद्ध क्षेत्र घोषित केल्या आहेत. आता निवडणूक जवळ येत असल्याने विरोधक अफवा पसरवत आहेत. केवळ यात्रा काढली आणि जाहीरनाम्यात आश्वासने दिली म्हणून होत नाही, तर ती पूर्ण करण्याची क्षमता असावी लागते, असा टोला लगावत राणे म्हणाले की,

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत नवरात्रोत्सव काळात महिला आणि युवकांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. सत्तरीचा विकास आपल्या वडिलांनी व आपण केल्यामुळेच सत्तरीतील मतदार आमच्या मागे राहिले, ते पुढेही राहतील, असे राणे यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news