अनिल पाटील
पणजी: राज्यात सत्ताधारी डॉ. प्रमोद सावंत मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या जोरदार चर्चा सुरू असताना भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि गोवा प्रभारी आशिष सूद गोव्यात दाखल झाले आहेत. शनिवारी २४ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी.नड्डा गोव्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर या राष्ट्रीय नेत्यांच्या गोवा भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे
गोव्यात सध्या मंत्रिमंडळातील फेरबदलासंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे. हे फेरबदल करताना नव्याने घेतल्या जाणाऱ्या मंत्र्यांसोबत मंत्रिमंडळातून काही मंत्री कमी करावे लागणार आहेत. त्यामुळे अनेक मंत्र्यांनी धास्ती घेतली आहे. तर नव्याने मंत्रिमंडळात दाखल होऊ पाहणाऱ्या आमदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा शनिवारी २४ ऑगस्ट रोजी गोव्यात येत आहेत.
दरम्यान जे. पी. नड्डा यांच्या हस्ते पणजी शेजारील कदंब पठारावरील 'बीजेपी भवन' च्या पायाभरणी शुभारंभ शनिवारी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता शेलार आणि सूद गोव्यात दाखल झाले असून प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान शेलार आणि सूद यांनी पायाभरणी समारंभाची पाहणी केली.