

सासश्टी : पुढारी वृत्तसेवा
राजबाग-काणकोण येथील आठ वर्षांपूर्वी घडलेल्या ब्रिटिश युवती डॅनियल मेकाग्लीन (वय २८) हिच्या खून प्रकरणी आरोपी विकट भगत (३१) याला दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश क्षमा जोशी यांनी आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
तसेच ३०२ खून, बलात्कार ३७६ व २०१ पुरावे नष्ट करणे या कलमाखाली प्रत्येकी २५ हजार रुपये मिळून ७५ हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. ही खुनाची घटना गेल्या १४ मार्च २०१७ रोजी घडली होती.