Manikrao Thakre | 'गोवा फॉरवर्ड काँग्रेसमध्ये विलीन करणार होते!' माणिकराव ठाकरेंच्या दाव्याने गोव्याच्या राजकारणात खळबळ

Vijai Sardesai | माणिकराव ठाकरे : निर्णयाआधीच वेगवेगळ्या अटी ठेवल्याने प्रस्ताव रखडला
Manikrao Kokate
Manikrao Kokatefile photo
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

आमदार विजय सरदेसाई यांनी गोवा फॉरवर्ड पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, निर्णय होण्याआधीच त्यांनी विविध अटी ठेवल्याने विलीनीकरणाचा प्रस्ताव रखडला, असा दावा काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. ठाकरे म्हणाले की, सरदेसाई यांनी विलीनीकरणासोबतच आघाडीचाही प्रस्ताव दिला होता.

Manikrao Kokate
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

अमित पाटकर प्रदेशाध्यक्ष असताना राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्यासमोर गोवा फॉरवर्डच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यानंतर मुंबईत माझी, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि विजय सरदेसाई यांची बैठक झाली. त्यातून चर्चेलाही सुरुवात झाली. मात्र, निर्णय मान्य करण्यापूर्वी सरदेसाई यांनी विविध अटी मांडल्या. त्यामुळे दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून त्यांच्यासमोर हा प्रस्ताव ठेवावा लागला.

'मी दिल्लीला मानत नाही,' अशी भूमिका प्रत्येक वेळी घेतली तर चर्चा पुढे कशी जाणार, असा सवालही ठाकरे यांनी केला. राष्ट्रीय पक्षाची काही धोरणे आणि व्यवस्था असतात. ती मोडून निर्णय घेता येत नाही. तथापि, विलीनीकरण आणि आघाडी या दोन्ही विषयांवर गिरीश चोडणकर सरदेसाई यांच्याशी चर्चा करतील.

Manikrao Kokate
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

काँग्रेसची दारे अजूनही खुली असून, त्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र बसणे आवश्यक आहे, असे ठाकरे म्हणाले. भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांची आघाडी व्हावी, अशी जनतेची इच्छा असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. त्यासाठी काँग्रेसने आघाडी समिती स्थापन केली होती. या समितीत चोडणकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, खासदार विरिएतो फर्नांडिस आणि कार्यकारी अध्यक्ष एम. के. शेख यांचा समावेश होता, असे ते म्हणाले.


सरदेसाईंची समितीसमोर कोणतीही सूचना नाही...

आरजीपीशी चर्चेची जबाबदारी चोडणकर व आलेमाव यांच्यावर, तर गोवा फॉरवर्डशी चर्चेची जबाबदारी विरिएतो फर्नांडिस व एम. के. शेख यांच्यावर सोपवण्यात आली होती. सरदेसाई यांच्याशी चर्चेसाठी दोघे येणार असल्याचे सांगण्यासाठी आपण तीन वेळा फोन केला. फर्नांडिस व शेख चर्चेसाठी गेलेही; मात्र सरदेसाई यांनी आपले मत, अपेक्षा किंवा सूचना समितीसमोर मांडल्या नाहीत, असा दावा ठाकरे यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news