Vibrant Goa Summit | व्हायब्रंट गोवा हे केवळ प्रदर्शन नव्हे तर व्यवसाय आहे : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Vibrant Goa Summit | व्हायब्रंट गोवा हे प्रदर्शन नव्हे तर व्यवसाय आहे. या परिषदेत नऊ सामंजस्य करार करण्यात आले आहेत.
CM Pramod Sawant
CM Pramod Sawantpudhari photo
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा
व्हायब्रंट गोवा हे प्रदर्शन नव्हे तर व्यवसाय आहे. या परिषदेत नऊ सामंजस्य करार करण्यात आले आहेत. ज्यामुळे राज्यात ८,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक शक्य होणार आहे. परिणामी सुमारे पाच हजारांहून अधिक रोजगारांची निर्मिती होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे केले.

CM Pramod Sawant
Panaji Municipal Corporation | ...आणि पणजी महापालिकेला आली जाग

ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद इनडोअर स्टेडियमवर आयोजित व्हायब्रंट गोवा समिट २०२६ च्या समारोप सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री सावंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय नवीनीकरण ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, संरक्षण राज्यमंत्री संजय शेटे, उद्योगमंत्री माविन गुदिन्हो, वन विकास महामंडळाच्या अध्यक्षा आमदार डॉ. देविया राणे, व्हायब्रंट गोव्याचे चेअरमन राजकुमार कामत यांच्यासह प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ क्रिकेटपटू कपिल देव उपस्थित होते.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले, राज्य सरकारच्या गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने २५० हून अधिक प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे १० हजारारांहून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. पुढील अंदाजपत्रकात मुख्यमंत्री निर्यात योजना समाविष्ट करण्यात येईल. कारण २०३७ पर्यंत एमएसएमईच्या माध्यमातून ५०० निर्यातदार तयार करण्याबरोबरच गोवा अव्वल १० राज्यांमध्ये समाविष्ट करण्याचे लक्ष्य असल्याचेही मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले.

CM Pramod Sawant
Panaji Municipal Corporation | ...आणि पणजी महापालिकेला आली जाग

यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, संजय शेटे, मंत्री गुदिन्हो, आमदार राणे यांनीही उपस्थानांना मार्गदर्शन केले. सैन्यातील मेजर डॉ. दीपक राव, डॉ. सीमा राव, उद्योजक अनिल खंवटे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

चेअरमन राजकुमार कामत म्हणाले, एमएसएमईसाठी निर्यात आणि जागतिक बाजारसाठी प्रशिक्षण देणार असून, पुढील वर्षी ऑक्टोबरमध्ये डिफेंस कॉन्क्लेव्ह (संरक्षण परिषद) आयोजित करण्यात येणार आहे. तर ऑक्टोबर २०२८ मध्ये व्हायब्रंट गोव्याची पुढील परिषद असेल.

गुंतवणुकीस योग्य वेळ : कपिल देव

ज्येष्ठ क्रिकेटपटू तथा उद्योजक कपिल देव म्हणाले की, क्रिकेट खेळणे थांबवले, पण खिलाडूवृत्ती नाही. युवकांनी अधिक कष्ट घेतले तर गोवा पुढील १० वर्षांत आर्थिकदृष्ट्या सक्षम राज्य असेल. येणारा काळ गोव्याचा असेल. सरकारने खेळावरही काही प्रमाणात खर्च करण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी सरकारला सुचवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.