Vasco Fish Market | बाहेर बसणाऱ्या 'त्या' विक्रेत्यांवर होणार कठोर कारवाई

Vasco Fish Market | मुरगाव पालिका नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांचा आदेश; आजपासून अंमलबजावणी
Rajapur Fish Market
सुसज्ज मार्केट तरीही रस्त्याकडेला मासे विक्री! Rajapur Fish Market(Pudhari Photo)
Published on
Updated on

वास्को : पुढारी वृत्तसेवा

खारीवाडा येथे घाऊक दराने मासळी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात शनिवारपासून कडक कारवाई करण्याचा इशारा मुरगावचे नगराध्यक्ष गिरिष बोरकर व मुरगावचे उपजिल्हाधिकारी प्रताप गावकर यांनी दिला. खारीवाडा येथील संबंधित विक्रेत्यांची सोय बावणा येथील मासळी मार्केटात करण्यात आली आहे, तेथे त्यांनी व्यवसाय करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. खारीवाडा येथे घाऊक दराने मासळी विक्री करण्यात येते. त्यामुळे तेथे ग्राहकांची मोठी गर्दी असते.

Rajapur Fish Market
Goa Kadamba Bus | आठवडाभरात कदंबच्या ताफ्यात 30 नव्या बसेस

त्या घाऊक विक्रेत्यांमुळे ग्राहक शहरातील मासळी मार्केटात फिरकत नसल्याचा दावा मार्केटातील मासळी विक्रेत्या नेहमी करतात. खारीवाडा येथील विक्रेत्यांविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी मार्केटातील विक्रेत्याची आहे. त्यामुळे कधीतरी मुरगाव पालिकेतर्फे खारीवाडा येथील घाऊक विक्रेत्यांविरोधात कारवाई होते. त्यानंतर पुन्हा जैसे थे चित्र तेथे दिसते. मध्यंतरी खारीवाडा येथील विक्रेत्यांची बायणातील मासळी मार्केटात सोय करण्यासंबंधी आमदार दाजी साळकर यांच्यासह नगराध्यक्ष गिरिष बोरकर तसेच इतर काही नगरसेवक, संबंधित विक्रेते यांची बैठक झाली होती.

त्यावेळी संबंधित विक्रेत्यांनी बायणा येथे जाण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. याऊलट ते घाऊक विक्रेते नेहमीप्रमाणे खारीवाडा येथे मासळी विक्री करू लागले. यामु‌ळे मासळी मार्केटातील विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या नाराजीची दखल घेऊन मुरगाव पालिकेने उपजिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र पाठविले होते. त्यानुसार शुक्रवारी (दि.२२) खारीवाडा येथे आकस्मिक पाहणी करण्यात आली.

याप्रसंगी मुरगावचे नगराध्यक्ष गिरिष बोरकर, मुख्याधिकारी सिध्दीविनायक नाईक, उपजिल्हाधिकारी प्रताप गावकर, मामलेदार प्रवीणजय पंडित, सर्कल इन्स्पेक्टर डी. डी. कोरगावकर, पोलिस निरीक्षक वैभव नाईक तसेच इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता. तेथील पाहणी केल्यावर प्रताप गावकर यांनी आश्चर्य व्यक्त केले. तेथे पूर्णपणे अवैधरित्या व्यवसाय करण्यात येत आहे.

तेथे स्वच्छता दिसत नाही. याप्रकरणी आम्ही दखल घेतली आहे. येथे रस्त्याकडेला काही वाहने उभी करण्यात आलेली आहेत. ती वाहने तेथून हटविण्यासंबंधी आरटीओ व पोलिसांना निर्देश देण्यात येणार आहे. त्या विक्रेत्याची बायणा मासळी मार्केटात सोय करण्यात आली आहे, त्यांनी तेथे व्यवसाय सुरू करावा असे आवाहन त्यांनी केले. त्या विक्रेत्यांना आम्ही आवाहन करण्यासाठी आलो आहोत. त्यांनी आवाहनाकडे दुर्लक्ष केल्यास शनिवारपासून त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Rajapur Fish Market
Goa Infant Mortality Rate 2026 | भारतातील दुसरा सर्वात कमी बालमृत्यू दर गोव्यात

बायणा मार्केटमध्ये व्यवसाय करा

नगराध्यक्ष बोरकर यांनी त्या विक्रेत्यांनी बायणा मासळी मार्केटात व्यवसाय सुरू करावा, असे आवाहन केले. शहर व बायणातील मासळी मार्केट अधिसूचित केले आहे. त्या विक्रेत्यांनी बायणा मासळी मार्केटात व्यवसाय करावा, यासाठी मुरगाव पालिका मंडळाने ठराव घेतला आहे. त्या विक्रेत्यांनी बायणा येथे व्यवसाय करण्यास राजी असल्याचे सांगितले होते.

परंतु, आता ते तेथे जाण्यास तयार नाही असे बोरकर म्हणाले. आम्ही आज त्यांना विनंती करण्यासाठी आलो आहोत, शनिवारी त्यांनी खारीवाडा येथे व्यवसाय सुरू ठेवल्यास त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. संबंधित विक्रेत्यांनी बायणा मासळी मार्केटात व्यवसाय सुरू केल्यास सर्वाना सोयीस्कर होईल, असे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news