Vasco Crime News | वास्कोत खळबळ! मच्छीमार व्यावसायिक मंजुनाथ हरिकांत यांची हत्या; आगशी पोलिसांकडून खुनाचा गुन्हा नोंद

Vasco Crime News | आगशी पोलिस बोटीवरील कामगारांच्या शोधात गोव्याबाहेर
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

वास्को : पुढारी वृत्तसेवा

खारीवाडा येथील रहिवाशी मंजुनाथ हरिकांत (वय ५५) यांच्या मृत्यूप्रकरणी आगशी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. मंजुनाथ यांच्या मच्छीमारी बोटीवर काम करणाऱ्या त्या दोन कामगारांकडे संशयाची सुई जात असल्याने त्याचा शोध पोलिस घेत आहेत.

Crime News
Shelgaon Murder Case | शेळगाव खून प्रकरणाचा उलगडा! पैशाच्या वादातून हत्या; चौघे ताब्यात

मंजुनाथ यांचा मृतदेह सापडल्यावर आगशी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली होती. शवविच्छेदन अहवालात मंजूनाथ यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे स्पष्ट करण्यात आल्याने पोलिसांनी सदर प्रकरण खून म्हणून नोंद केले आहे. दरम्यान, संशयितांच्या शोधात आगशी पोलिस स्थानकाचे पथक गोव्याबाहेर रवाना झाले आहे.

मंजूनाथ हे गेले अनेक वर्षे खारीवाडा येथे एका खोलीत राहतात. त्यांची बहिण अगोदर त्यांच्यासमावेत असे. तिचे लग्न झाल्यावर मंजूनाथ एकटेच राहत होते. त्यांच्याकडे दोन मच्छीमार बोटी होत्या. त्यापैकी एक त्यांनी विकल्याचे समजते. आता एका मच्छीमारी बोटीने ते मासेमारी करीत होते. तीन दिवसांपूर्वी ते खारीवाडा फिशिंग जेटीवरून खोल समुद्रात मासेमारीसाठी गेले होते. त्यांच्यासमवेत दोन कामगार होते.

Crime News
Dhule Murder | साक्री तालुक्यात तरुण आणि तरुणीची वेगवेगळ्या ठिकाणी खून, भोंदू गिरीतून हत्याकांड?

पाच सहा तासांनी ती बोट धक्क्यावर नांगरण्यात आली होती. त्या बोटीवर काम करणारे कामगारही आपल्या खोलीतील सामान घेऊन तेथून गेले होते. दुसऱ्या दिवशीही ती बोट तशीच धक्क्यावर उभी असल्याने तसेच कावळे त्यातील मासे खात असल्याचे पाहून काहीजणांनी मंजूनाथ याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

मोबाईलद्वारा संपर्क साधण्याचा प्रयत्न फोल ठरला. त्यामुळे मंजुनाथ गेले कोठे याबद्दल चर्चा सुरू झाली. त्यानंतर आगशी येथे झुआरी नदीत एक मृतदेह सापडल्याची माहिती मिळाल्याचे येथील काही मच्छिमार बांधव तेथे गेले होते. तो मृतदेह मंजूनाथ याचा असल्याचे स्पष्ट झाल्यावर आगशी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली होती. शवविच्छेदनानंतर एकंदर चित्र स्पष्ट झाल्याने मंजुनाथ यांचा मृत्यू खून म्हणून नोंद करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news