Vagator Turtle Conservation | कासव संवर्धन यादीतून 'वागातोर' वगळले

Vagator Turtle Conservation | अंडी घालण्याचे मोठे प्रमाण असूनही वन खात्याचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप
Turtle Conservation
Turtle Conservation
Published on: 
Updated on: 

म्हापसा (पुढारी वृत्तसेवा):

वागातोर समुद्राकिनारावर गेल्या काही वर्षांपासून ऑलिव्ह रिडले जातीची समुद्री कासवे अंडी घालण्यासाठी येतात हे निदर्शनास आलेले असतानाही वन खात्याने काही दिवसांपूर्वी फक्त गोव्यातील मोरजी, मांड्रें, आगोंद आणि गाळजीबागचा या फक्त चार समुद्रकिनाऱ्यांवर कासवांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र संपर्क व्यवस्था सुरू करण्याचा प्रस्ताव आहे, हे एक प्रकारे वन खात्याचे जाणीवपूर्वक दुर्लक्षपणा करण्याचे लक्षण असल्याचे सांगण्यात आले. हा किनारा कासव संवर्धन क्षेत्र म्हणून निर्देशित करावे तसेच या ठिकाणी हॅचरी सुरू करावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे.

Turtle Conservation
Mapusa Minor Girl Assault | घृणास्पद! म्हापसा बाजारपेठेत फुगे विकणाऱ्या गरीब कुटुंबातील चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

गोव्यातील काही समुद्रकिनाऱ्याप्रमाणे वागातोर समुद्रकिनाऱ्यावरही सागरी कासवे अनेक वर्षांपासून अंडी घालण्यासाठी येत आहेत. परंतु यापूर्वी कोणीही त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले नव्हते. गेल्या पाच वर्षांपासून हणजूण कायसुच जैवविविधता समितीने संरक्षणसाठी मोरजी, मांड्रें, आगोंद, गाळजीबागचा समावेश, स्वतंत्र संपर्क व्यवस्था सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. जैवविविधतेच्या माध्यमातून कासवे अंडी घालण्याच्या प्रकाराकडे लक्ष दिले आणि त्याचे संवर्धन करण्याची मोहीम सुरू केली.

वनखात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२४ ते १५ एप्रिल २०२४ पर्यंत सागरी कासवांच्या प्रजोत्पादनाच्या हंगामात वागातोर समुद्रकिनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले जातीची सागरी कासवांनी तब्बल २० वेळा अंडी घातली होती, यात फक्त मार्च महिन्यातच १७ वेळा अंडी घातल्या जागी, या एकूण कालावधीत वनखात्याला एकूण १८६८ अंडी मिळाली.

२०२१ ते २२ या वर्षात वागातोर किनाऱ्यावर चार वेळा समुद्री कासवांनी अंडी घातली होती, तर २०२२ ते २३ या कालावधीत तीन वेळा कासवांनी सुमारे ३६४ अंडी घातली. त्यातून १७३ कासवांची पिले समुद्रात सोडण्यात आली होती. २०२५ - २०२६ या कालावधीत सुमारे दहा वेळा समुद्री कासवांनी ११६० अंडी घातली. यातून फक्त ३३४ पिले बाहेर सोडण्याचे वनखात्याकडून सांगण्यात आले.

कालावधीत पाच ते सहा वेळा समुद्री कासवे अंडी न घालता माघारी फिरल्याचे शंका झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे जैवविविधता समितीचे अध्यक्ष रमेश नाईक यांनी सांगितले. फक्त ३३४ पिले समुद्रात सोडण्यात आल्याचे वनखात्याकडून सांगण्यात आले. याचाच अर्थ २२ अंडी खराब झाली. हॅचरी जर वागातोर किनाऱ्यावर सुरू केली असती तर आणखी पिले बाहेर पडली असती कारण हवामान बदल किंवा येथून हलवल्यामुळे खराब झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे जैवविविधता समितीचे अध्यक्ष रमेश नाईक यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांत ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांनी मोठ्या प्रमाणात किनाऱ्यावर चार वेळा समुद्री कासवांनी घातली याला कारण त्यांना बऱ्याचदा पोषक असे वातावरण मिळाले होते. नाहीतर पूर्वी येथील समुद्रकिनाऱ्यावार काही जणांकडून रात्रीच्या वेळी रेव पार्टीचे आयोजन केले जाते. ज्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर येणारी कासवे विचलित होत असावीत आणि माघारी फिरत असावीत असा एक प्रकारे निष्कर्ष निघतो.

मिळालेल्या माहितीनुसार, या समुद्रकिनाऱ्यावर रेव पार्टीचे आयोजन होत नसते तरी येथील एका तारांकित हॉटेलमध्ये कर्णेकर्कश संगीता वाजवल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत. रेव पार्ट्या होत नसल्या तरी या किनाऱ्यावर काही पर्यटकांकडून रात्रभर धिंगाणा घातला जातो तसेच किनाऱ्यावर वाहने चालवण्याचे प्रकार होतात याकरिता पर्यटक पोलिस खाते किनारा पोलिस खाते व स्थानिक पोलिसांनी या किनाऱ्यावर रात्रीची गत वाढवावी, अशा मागणीचे निवेदन त्यांनी दिले असल्याचे हणजूण कायसुच जैवविविधता समितीचे अध्यक्ष रमेश नाईक यांनी सांगितले.

Turtle Conservation
Mapusa Minor Girl Assault | घृणास्पद! म्हापसा बाजारपेठेत फुगे विकणाऱ्या गरीब कुटुंबातील चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

प्रजोत्पादन काळात रात्री पोलिस गस्त हवी

जर समुद्री कासवे एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिवर्षी या ठिकाणी अंडी घालण्यात येत असतील तर मुख्यमंत्री, वन मंत्री, वन खात्याने तसेच गोवा किनारी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाने याची दखल घेऊन या ठिकाणी कासव संवर्धन केंद्र (हॅचरी) उभारून संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करावे त्याचबरोबर कासवांच्या प्रजोत्पादनाच्या हंगामात रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त ठेवावी, अशी मागणी रमेश नाईक यांनी केली.

...तर अंडी मोरजीला नेणे सुरूच राहील

वन खात्याच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कासवांची पिले ज्या समुद्रकिनाऱ्यावरून समुद्रात जातात ती मोठी झाल्यावर पुन्हा त्यात समुद्रकिनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येतात. मोरजी येथील समुद्रकिनाऱ्यावर समुद्री कासवे अंडी देण्यासाठी येतात त्यामुळे या ठिकाणी कासव संवर्धन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे, तर वागातोर -किनाऱ्यावर कासव संवर्धन केंद्र असते तर या ठिकाणी सर्व अंडी ठेवता आली असती, आणि येथून तयार होणारी कासवांची पिले पुन्हा याच समुद्रकिनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येथील, तसे न झाल्यास अंडी वाгатоर येथे घालणे आणि ती मोरजीला नेणे असा प्रकार वर्षानुवर्षे सुरू राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.