CM Pramod Sawant | दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाजवळील सांडपाण्याचा प्रश्न लवकरच सोडवू

CM Pramod Sawant | मुख्यमंत्र्यांची ग्वाही : पर्यावरणवादी कार्यकर्त्यांकडून चिंता व्यक्त
CM Dr. Pramod sawant
CM Dr. Pramod sawant
Published on
Updated on

सासष्टी : पुढारी वृत्तसेवा
दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाजवळील नाल्यात सांडपाणी वाहून जाण्याची समस्या लवकरच सोडवली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. शहरातील आणि परिसरातील नाल्यांमध्ये सांडपाणी मिसळून ते शेवटी साळ नदीकडे वाहून जात असल्याच्या वारंवार होणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर, मडगाव दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना सावंत यांनी हे आश्वासन दिले.

CM Dr. Pramod sawant
मडगाव : सासष्टी तालुक्यात दिग्गजांचा पराभव

दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाला लागून असलेल्या नाल्याबाबत रहिवासी आणि पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी विशेष चिंता व्यक्त केली आहे. कारण या नाल्यातून सांडपाणी वाहताना वारंवार दिसून आले आहे. या सांडपाण्यामुळे प्रदूषण, सार्वजनिक आरोग्य आणि शेतजमीन, संबंधित जलस्रोत व साळ नदीवर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत चिंता निर्माण झाली आहे.

विविध प्राधिकरणांनी पाहणी करून आणि सूचना देऊनही ही समस्या कायम आहे. सांडपाणी व्यवस्थापन यंत्रणा आणि वारंवार तक्रारी करूनही, प्रक्रिया न केलेले सांडपाणी पावसाळी पाण्याचा निचरा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये (स्टॉर्म-वॉटर ड्रेन) सोडले जात आहे, असा प्रश्न रहिवासी उपस्थित करत आहेत.

CM Dr. Pramod sawant
Cyber Fraud Case Goa | नुवे येथील युवकाला 1.85 लाखाला ऑनलाईन गंडा

केवळ प्रभावित नाला साफ करण्याऐवजी, सांडपाणी येण्याचा स्रोत शोधून तो कायमचा बंद करावा, अशी मागणी पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि रहिवाशांनी केली आहे. रहिवाशांनी सावंत यांच्या आश्वासनाचे स्वागत केले; परंतु प्रत्यक्ष कृतीची वाट पाहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने, आता साळ नदीकडे जाणाऱ्या नाल्यात होणारा सांडपाण्याचा प्रवाह रोखण्यासाठी संबंधित विभागांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या समस्येवर अनेकदा चर्चा आणि पाहणी झाली आहे. आता गरज आहे ती कायमस्वरूपी उपायांची. मुळात सांडपाणी नाल्यात जाण्यापासूनच रोखले पाहिजे, असे समाजसेवक मिलाग्रेस फर्नांडिस यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news