ओव्हरटेक करताना कारची दुचाकीला धडक; दोघे ठार; कारचालक ताब्यात

ओव्हरटेक करताना कारची दुचाकीला धडक; दोघे ठार
goa news
ओव्हरटेक करताना कारची दुचाकीला धडक; दोघे ठार; कारचालक ताब्यात File photo
Published on
Updated on

पणजी/डिचोली: पेठवाडा-नानोडा येथील व्हॅली मिडोज येथील कळणावर कार आणि दुचाकीत भीषण अपघात झाला. या अपघातात प्रतीक कानोळकर (२२, रा. कानीळकरताडा- नानीडा) आणि लक्ष्मण माळीक (१९ रा. वरचावाडा) हे जागीच ठार झाले, अशी माहिती डिचोली पोलिस ठाण्यातून देण्यात आली.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, अस्नोडा येथून नानीडाच्या दिशेने (जीए ०४ पी ५१२६) या दुचाकीने दोघेजण जात होते. त्याच दरम्यान (जीए ०४ ११२४) ही कार नानोड्यावरून असनोडा येथे जात होती. दरम्यान, ही कार नानोडातील एका कंपनीजवाळ आली असता, कारचालकाने समोरील बाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला यावेळी त्याची जोरदार बड़क रामोरून येणाऱ्या दुचाकीला बसली, या धडकेत दुचाकीवरील दोघेजण खाली कोसळत रस्त्यापासून बरेच दूरवर पडले. त्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता. कारची धडक एवढी मोठी होती की, दुचाकीचे पुढील चाक निखळून पडले.

तसेच ही दुचाकी जवळपास ५० मीटर अंतरावर फरफटत गेली. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, अपघातानंतर गोवा दोडामार्ग पोलिस स्थानकाचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.

या प्रकरणातील कार चालकाला ताब्यात घेऊन गोवा-दोडामार्ग पोलिस ठाण्यात नेण्यात आले. अपघाताप्रकराची कारचालकाची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.

goa news
सांगोला-पंढरपूर रोडवर दुचाकीला कारची धडक; ३ मेंढपाळ तरुण ठार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news