two-siblings-die-electric-shock
दोन सख्ख्या भावंडांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू(Pudhari File Photo)

Electric Shock | दोन सख्ख्या भावंडांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

शिवसुरे-रिवण येथील दुर्घटना; कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Published on

मडगाव : गणरायाच्या आगमनामुळे राज्यात उत्साहाचे वातावरण असताना, सांगेमधील शिवसुरे-रिवण येथे मन हेलावून टाकणारी दुर्घटना घडली आहे. गुरांसाठी चारा आणण्यास जंगलात गेलेल्या राजेंद्र गावकर (वय 46) आणि मोहनदास गावकर (40) या एकाच घरातील दोन सख्ख्या भावांचा रानटी जनावरांच्या शिकारीसाठी लावलेल्या वीज तारेशी संपर्क आल्याने जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना बुधवारी रात्री उशिरा घडली. चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण रिवण गाव शोकसागरात बुडाला आहे. गावकर कुटुंबीयांनी एकत्रित पुजलेल्या गणेशमूर्तीचे विसर्जन केले आहे.

राजेंद्र आणि मोहनदास हे दोघेही बंधू गुरांचा व्यवसाय सांभाळतात. त्यांच्या पश्चात एक विवाहित बहीण आणि वृद्ध आई असा परिवार आहे. आठ वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्या दुःखातून गावकर कुटुंब सावरते न सावरते तोच आता या कुटुंबातील दोन कर्त्या पुरुषांच्या निधनाने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. या कुटुंबाची रोजीरोटी, शेती आणि दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news