Goa Tuyem Hospital| तुये इस्पितळ पूर्ण क्षमतेने सुरू करा

Goa Tuyem Hospital| पेडणेवासीयांची मागणी : मुख्यमंत्र्यांना निवेदन; ... अन्यथा उपोषणाचा इशारा
goa news
goa news
Published on
Updated on

पेडणे : पुढारी वृत्तसेवा

तुये येथील १०० खाटांच्या इस्पितळाला गोमेकॉशी संलग्न करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी या इस्पितळातील सर्व ओपीडी आणि अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा पूर्णपणे कार्यान्वित कराव्यात, अशी आग्रही मागणी पेडणे तालुक्यातील रहिवाशांनी सरकारकडे केली आहे. इस्पितळाच्या सक्षमीकरणाकडे दुर्लक्ष करून केवळ कागदोपत्री लिंक केल्यास त्याचा फटका आरोग्य सेवेला बसेल, अशी भीती व्यक्त करत स्थानिकांनी या संदर्भात सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

goa news
Goa Tribal Culture | आदिवासी संस्कृतीचे जतन हाच खरा विकासाचा मापदंड; कला व संस्कृती मंत्री डॉ. रमेश तवडकर

दरम्यान, तुये हॉस्पिटल कृती समितीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. सरकारने तुये इस्पितळ जीएमसीला जोडण्याबाबतची अधिसूचना जारी केली असली, तरी या निर्णयाच्या घाईमुळे स्थानिक रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.

जोपर्यंत हे इस्पितळ पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी आवश्यक डॉक्टर, कर्मचारी आणि यंत्रसामग्री उपलब्ध होत नाही, तोपर्यंत ही प्रक्रिया पुढे नेऊ नये, अशीही भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. पेडणेसारख्या ग्रामीण भागात उत्तम आरोग्य सुविधा मिळणे हा स्थानिकांचा हक्क असून, केवळ कागदोपत्री सोपस्कार करण्यापेक्षा प्रत्यक्ष सुविधांवर भर देण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली आहे.

goa news
Goa GMC | गोमेकॉला एआय हब बनविण्याचे ध्येय; आरोग्यमंत्री विश्वजित राणेंची घोषणा

या संदर्भात रहिवाशांनी प्रशासनाकडे २७ जानेवारीपर्यंत लेखी स्पष्टीकरण मागितले आहे. या मुदतीपर्यंत इस्पितळ पूर्णपणे कार्यान्वित करण्यासाठी सरकार कोणती पावले उचलणार आहे, याची स्पष्ट रूपरेषा जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जर प्रशासनाने यावर समाधानकारक उत्तर दिले नाही,

तर २८ जानेवारीपासून बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. स्थानिक नेत्यांच्या मते, हे आंदोलन पेडणेवासीयांच्या हक्काच्या आरोग्य सुविधेसाठी आहे. तुये इस्पितळाचा मूळ उद्देश हा स्थानिक जनतेला सर्व सोयींयुक्त उपचार मिळावेत हाच असायला हवा, असे त्यांनी स्पष्ट केले. आता यावर सरकार काय भूमिका घेते आणि २७जानेवारीपूर्वी काय उत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news