CM Pramod Sawant | तुये इलेक्ट्रॉनिक सिटीत रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट

CM Pramod Sawant | मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : नवीन बोरी पुलाची लवकरच पायाभरणी
CM Pramod Sawant
CM Pramod Sawantpudhari photo
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा
तुये इलेक्ट्रॉनिक सिटीमध्ये १० हजार रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील, तसेच आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी नवीन बोरी पुलाची पायाभरणी केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी भाजपच्या मुख्यालयत आयोजित पक्षाच्या बैठकीत दिली.
तुये इलेक्ट्रॉनिक सिटीमध्ये सहा ते सात कंपन्यांनी गुंतवणुकीसाठी स्वारस्य दाखवले आहे.

CM Pramod Sawant
Global Business Summit | व्हायब्रंट गोवा ग्लोबल बिजनेस समिटला उद्यापासून प्रारंभ

या प्रकल्पामुळे सुमारे १० हजार रोजगाराच्या संधी निर्माण होण्याच्या अपेक्षा आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत बोलताना डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, २०२२ मध्ये १४ फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणूक झाली होती. आगामी निवडणूकही याच कालावधीत होण्याची शक्यता आहे.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या मतदान केंद्रांवर विजय मिळवण्यासाठी प्रयत्न केले, तर पक्षाला विजय मिळवता येईल. त्यामुळे आगामी निवडणूक पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. 'मिशन २०२७'ची तयारी करताना आत्मपरीक्षण करून निवडणुकीच्या तयारीला लागण्याची गरज आहे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

CM Pramod Sawant
Global Business Summit | व्हायब्रंट गोवा ग्लोबल बिजनेस समिटला उद्यापासून प्रारंभ

विकासासाठी भाजप कार्यरत

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची विचारधारा पुढे नेणे आणि समाजाच्या कल्याणसाठी काम करणे, हा पक्षाचा उद्देश आहे. केवळ मुख्यमंत्री किंवा मंत्री होण्यासाठी नव्हे, तर राज्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आणि मानव संसाधनाचा विकास करण्यासाठी भाजप सरकार कार्यरत असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले, आपण मुख्यमंत्री झाल्यापासून राज्याचा अर्थसंकल्प १९ हजार कोटी रुपयांवरून ३१ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. नव्या योजना सुरू करतानाच जुन्या योजनाही सुरू ठेवण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या सहकार्याने राज्यात अनेक विकास प्रकल्प, रस्ते आणि पूल उभारण्यात आले आहेत. सरकारने केलेल्या विकासकामांच्या जोरावर आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळेल, असा विश्वास डॉ. सावंत यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news