Trinmool Congress Goa: तृणमूल काँग्रेस गोव्यातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? पणजीतील पक्षाचे मुख्य कार्यालय पडले बंद

Trinmool Congress Goa | पणजीतील कार्यालय केले बंद; मागील विधानसभा लढवल्या होत्या २४ जागा
Trinmool Congress Goa
Trinmool Congress Goa
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा
२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत मगो पक्षाशी युती करून तृणमूल काँग्रेसने तब्बल २४ जागा लढवल्या होत्या. मात्र, पक्षाचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. आता पणजीतील पक्षाचे कार्यालयही बंद करण्यात आल्याने तृणमूल काँग्रेस गोव्यातून गाशा गुंडाळणार असल्याचे चिन्हे दिसू लागली आहेत.

Trinmool Congress Goa
Panaji Municipal Corporation | ...आणि पणजी महापालिकेला आली जाग

२०२२ च्या निवडणुकीत मगोशी युती करून तृणमूल काँग्रेसने काही माजी आमदारांना आणि जिल्हा पंचायत सदस्यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी चांगली मते मिळवली; मात्र विजय मिळवता आला नाही.

पर्वरीतून संदीप वझरकर (३,७६७ मते), थवीतून कविता कांडोलकर (७,३६३ मते), बाणावलीतून चर्चिल आलेमाव (५,१४० मते) आणि नावेलीतून वालंका आलेमाव (४,७३८ मते) यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. तर, पक्षाचे माजी राज्याध्यक्ष किरण कांडोलकर यांनी हळदोडून ३,६४७ मते मिळवून तिसरा क्रमांक पटकावला होता.

Trinmool Congress Goa
Foreign Woman Rape Case | परदेशी महिलेवरील बलात्कारप्रकरणी बंगळुरुस्थित खासगी कंपनीच्या सीईओला पणजी महिला पोलिसांकडून अटक

देशभर पक्षाचा विस्तार करण्याच्या प्रयत्नांतर्गत गोवा विधानसभा निवडणुकीतही पक्षाने मोठा खर्च केला होता. मात्र, एकही उमेदवार निवडून आला नाही. त्यानंतर पक्षाच्या राज्याध्यक्षांसह अनेक उमेदवारांनी पक्ष सोडला होता.
निवडणुकीबाबत प्रवक्ते अनभिज्ञ...
तृणमूल काँग्रेसचे मुख्यालय पणजीतील आत्माराम बोरकर मार्गावर आहे. ते सध्या बंद आहे. पक्षाच्या वरिष्ठांकडून आदेश येत नाहीत, तोपर्यंत पक्ष निवडणूक लढवणार की नाही, याबाबत आपण काही सांगू शकत नाही, असे तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.