goa news
लाडफेतील धबधबा पर्यटनासाठी बंदpudhari photo

लाडफेतील धबधबा पर्यटनासाठी बंद

लाडफेतील धबधबा पर्यटनासाठी बंद

डिचोली : लाटंबार्से पंचायत क्षेत्रातील लाडफे गावात पावसाळ्यात प्रवाहीत होणाऱ्या धबधब्यावर पर्यटकांना पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली असून या संदर्भात सातेरी केळबाई देवस्थान व लाडफे ग्रामस्थांनी कडक भूमिका घेतलेली आहे.

गावाचे नैसर्गिक वैभव असलेला हा झरा या ठिकाणी यापूर्वी पर्यटन येऊन धिंगाणा घालायचे तसेच तळीरामांची ही वाढती संख्या इथे येत असल्याने या ठिकाणी गेल्या दोन वर्षांपासून देवस्थान समितीने पूर्ण बंदी घातलेली आहे. यावेळीही ही बंदी घालण्यात आली आहे.

देवस्थान समितीचे विष्णू मळीक, प्रमोद मळीक, सूरज मळीक, नितीन मळीक, आत्माराम मळीक, संजीव मळीक, यशवंत मळीक, सर्वेश मळीक आदींनी या संदर्भात विविध खात्यांना निवेदन देऊन या ठिकाणी कोणीही पर्यटक आल्यास कारवाई करण्यात यावी, अशा स्वरूपाचे निवेदन विविध खात्यांना देवस्थान समितीतर्फे देण्यात आलेले आहे.

logo
Pudhari News
pudhari.news